Breaking News

नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी झिरो पेंडसी उपक्रम राबवावा - मुख्यमंत्री

नागपूर : महानगरपालिकेतील नागरी सुविधांची कामे विकेंद्रीत पद्धतीने होण्यासाठी झोन कार्यालयाची निर्मिती करण्यात आली असून नागरीकांची कामे जलद पद्धतीने होण्यासोबतच जलद कार्यपद्धतीसाठी झिरो पेंडसी उपक्रम राबवावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.

नागपूर महानगरपालिकेच्या नवनिर्मित सतरंजीपुरा झोन कार्यालयाचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
केंद्रीय भुपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी, ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार डॉ. मिलींद माने आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, नागरीकांची कामे जलदगतीने होण्यासाठी महापालिकेने झोन निर्मितीचा निर्णय घेतला. यामध्ये सतरंजीपुरा झोन निर्माण व्हावा, यासाठी या भागातील लोकप्रति निधींनी प्रयत्न केले होते. झोन निर्मितीसोबतच सुसज्ज इमारत उभारण्यात आली आहे. नागरीकांच्या सुविधेसाठी शासनाने झिरो पेंडसी उपक्रम हाती घेतला आहे. यात सुमारे एक क ोटीहून अधिक फाईल निकाली काढण्यात आल्या आहे. दररोजचे काम दररोज होण्यासाठी महापालिकेतही झिरो पेंडसी उपक्रम राबविणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले.