Breaking News

वैदीक भटी परंपरेला झिडकारून शिवधर्म पध्दतीने पार पडला विवाह सोहळा,अहमदनगर जिल्ह्यातून बहुजन परिवर्तनाच्या चळवळीला कुंभार समाजाने दिले बळ


हजारो वर्ष वैचारिक गुलामगीरीच्या जोखडात जखडलेल्या बहुजन समाजाने साखळदंड उद्धवस्त करण्याचा निर्धार केला आहे याचा प्रत्यक्ष पुरावा तालुक्यातील निमगाव निघोज येथील एका विवाहसोहळ्यात कुंभार समाजाने जगासमोर ठेवला आहे. वर्षानुवर्ष पंचांगांच्या पानात अडकलेला हा समाज आता शहाणा झाला आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी दाखवलेली सत्य शोधनाची कास धरून आमचा धर्म शिव धर्म आहे. कर्मकांड थोतांड असून ब्रम्ह मंगलाष्टकांना जिजाऊ वंदना आणि शिव मंगलाष्टकांचा पर्याय आम्ही निर्माण के ला आहे, असा संदेश संस्कृती मंगल कार्यालयात पार पडलेल्या विवाह सोहळ्यातून गाडेकर आणि उपाध्ये या कुंभार समाजातील कुटूंबाने तमाम बहुजनांना दिला आहे. यावेळी सर्व भटी परंपरांना जाणीवपुर्वक दिलेला फाटा आणि विवाहमंडपातील विचारमंचावर महापुरूषांच्या दर्शनी भागात लावलेल्या प्रतिमा या विवाहसोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले.
जे लोक दैववादी असतात ते नामर्द असतात जे लोक प्रयत्नवादी असतात तेच खरे मर्द असतात, युवराज राजे संभाजी महाराज यांच्यासह पंचागांच्या मागे लागतो अडाणी पाहे क्षणोक्षणी शुभाशुभ, कामचुकारांना धार्जिन पंचांग सडलेले अंग संस्कृतीचे असा संदेश शेकडो वर्षापुर्वी देऊन वैदीक भटी परंपरेत अडकलेल्या समाजाला भानावर आणणारे जगदगुरू तुकाराम महाराज यांचा वैचारिक सहवास राहाता तालुक्यातील निमगाव निघोज बायपासवर असलेल्या संस्कृती मंगल कार्यालयात पार पडलेल्या विवाह सोहळ्यात कुंभार समाजाला लाभला.
निमित्त होते, कोर्‍हाळे येथील शिवमती मनिषा व शिवश्री शांताराम उपाध्ये यांची कन्या कल्याणी आणि सिन्नर येथील शिवमती.संगिता आणि शिवश्री रूंजा दादा गाडेकर यांचे सुपुत्र निलेश यांच्या विवाह सोहळ्याचे.
एरवी विवाहसोहळा म्हटले की नेहमीची, पारंपारिक वैदिक लगबग, ब्रम्हवृदांचे लाड या सोहळ्यात अपवादानेही पहायला मिळाले नाही. बहुजन समाज हजारो वर्ष वैदीक भट परंपरेतील कर्मकांडात भरडला गेला. सामान्य माणूसच नाही तर राज्यकारभारात अधिकार प्राप्त महानुभवानांही या पंरपंरेने सळो की पळो करून सोडले होते. त्यातूनच तथागत गौतम बुध्द, सम्राट चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक, संत परिक्षक संत गोरोबा काका, जगतगुरू संत श्री तुकाराम महाराज, स्वराजाचे निर्माते बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, युवराज राजे संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहु महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगे महाराज, शाहीर अण्णाभाऊ साठे या महापुरूषांनी या परंपरेला तीव्र विरोध करून समाज परिवर्तनासाठी हयात खर्ची घातली. त्यांनी रूजविलेल्या वैचारिक बीजांना आता बहुजनसमाजात रूजविण्याची प्रक्रीया खर्‍या अर्थाने राहता तालुक्यात पार पडलेल्या कुंभार समाजाच्या विवाहसोहळ्यात प्रत्यक्ष पहायला मिळाले.
उपाध्ये आणि गाडेकर कुटूंबाने या विवाहसोहळ्यात वैदीक भटी परंपरेला फाटा देत ज्योतीबांच्या सत्य शोधक धर्माची कास धरून शिवधर्म पध्दतीने विवाह सोहळा पार पाडण्याचे धाडस दाखवले.विवाह सोहळ्याला जिजाऊ वंदनाने प्रारंभ करून वैदीक मंगलाष्टक नाकारून शिव मंगलाष्टक गायले गेले. विवाहसोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी छापण्यात आलेल्या लग्न पत्रिकाच बहुजन समाजात होत असलेला बदल दाखवण्यास पुरेशी आहे. या पत्रिकेत सर्वच महापुरूषांची विचारधारेला जाणीवपुर्वक स्थान देऊन बहुजन समाजाला आता प रिवर्तनाच्या प्रक्रीयेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या सोहळ्यात पारंपारीक दैवतांच्या प्रतिमा नाकारून सर्व महापुरूषांच्या प्रतिमांना विचारमंचावर स्थान देण्यात आले होते.

आजचा हा विवाह सोहळा खर्‍या अर्थाने ऐतिहासिक असून बहुजन समाजाला परिवर्तनाच्या प्रक्रीयेत नेण्यासाठी दिशादर्शक आहे. शांतीचा संदेश देणारे प्रेम करूणा, समता प्रदान क रणारे तथागत गौतम बुध्द, सम्राट चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक, वैदिक परंपरेचा राज्याभिषेक नाकारून शैव पध्दतीचा राज्याभिषेक करवून घेणारे स्वराज्य निर्माते बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, युवराज संभाजी राजे, सातशे वर्षापुर्वी वैदीक परंपरा नाकारणारे संत परिक्षक संत गोरोबा काका, या देशातील भट-ब्राम्हणांच्या दक्षिणेला सातत्याने विरोध करणारे क्रांती ज्योती महात्मा ज्योतीबा फुले, गावासोबत समाजमनाची स्वच्छता करण्याचा संदेशाकृत कृती करणारे गाडगे महाराज, जगतगुरू संत तुकाराम महाराज, मनचंगा तो क ठोती मे गंगा हा संदेश देणारे संत कबीर, राजश्री शाहु महाराज, पुन्हा एकदा राज्य घटनेच्या माध्यमातून भारतीय समाजाला समतेचा अधिकार देणारे घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या विचारांचे अधिष्ठान असलेला हा विवाहसोहळा ऐतिहासिकच आहे. या विवाह सोहळ्याच्या माध्यमातून उपाध्ये आणि गाडेकर या कुंभार समाजातील सोयर्‍यांनी बहुजन समाजाला परिवर्तनाच्या मार्गावर आणले आहे. त्याचे सारे श्रेय युगपुरूष शिवधर्माचे संस्थापक पुरूषोत्तमजी खेडेकर यांनाच आहे. विसाव्या आणि एकविसाव्या शतकाच्या या परिवर्तनाच्या चळवळीत बहुजन समाजाला पुन्हा एकदा शिवधर्माच्या विचारमंचावरून चेतना देण्याचे काम पुरूषत्तमजी खेडेकर करीत असून या  विवाहसोहळ्याच्या निमित्ताने त्याचा पहिला मान कुंभार समाजाने मिळवला ही बाब अभिमानाची आहे.
- अशोक सोनवणे, राष्ट्रीय क्रांतीसूर्य सत्यशोधक ओबीसी सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष, अखिल भारतीय प्रजापती कुंभकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष, बारा बलुतेदार महासंघाचे प्रवक्ते, राष्ट्रीय सामाजिक समता पुरस्काराचे मानकरी तथा दैनिक लोकमंथनचे संपादक