सिंधुदुर्गात यंत्राद्वारे उसतोडणीची सुरुवात
सिंधुदुर्गनगरी, दि. 02, एप्रिल - सिंधुदुर्गात ऊस शेतीमध्ये क्रांती घडत आहे. जिल्हयात उसाचे उत्पादन वाढत असतानाच मालवण तालुक्यातील मसुरे येथे ऊस तोडणारी पहिली मशीन दाखल झाली आहे. येथील शेतक-यांनी ऊस तोडण्यास शनिवारी सकाळपासून सुरुवात केली आहे. जिल्हयामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारच्या ऊस तोडणी मशीनचा वापर केला जात आहे. या मशीनच्या वापरातून दिवसाला कमीत कमी 125 टन ऊस तोडला जाणार आहे. मसुरे येथे थांबलेली ऊस तोडणी सुरू झाल्याने शेतकरी वर्गामध्ये समाधान व्यक्त होत आहे.
सदरची मशीन डी. वाय. पाटील साखर कारखान्याच्या माध्यमातून आणण्यात आली असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी मसुरे येथे दिली. मसुरे येथे या नवीन ऊस तोडणी यंत्राचा शुभारंभ सतीश सावंत यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी माहिती देताना सावंत म्हणाले, येथील जास्तीत जास्त ऊस हा डी. वाय. पाटील साखर कारखान्याला वितरीत केला जातो. परंतु बीड जिल्हयामध्ये मोठा पाऊस झाल्याने मजुरांची टंचाई महाराष्ट्रामध्ये मोठया प्रमाणात जाणवू लागली. मजूर टंचाईवर मात करण्यासाठी मशीन वापरली जाते. त्या अनुषंगाने डी. वाय. पाटील साखर कारखान्यामध्ये एम. डी. तसेच चेअरमन, आमदार सतेज पाटील यांच्याशी चर्चा करून सिंधुदुर्गामध्ये हे ऊस तोडणी यंत्र आणण्यात आले. या यंत्राने येथील ऊस तोडणी चांगल्या पद्धतीने होत आहे. ऊस तोडणी दरम्यान उसाचे शेतामध्ये पडणारे पाचर न जाळता शेतामध्ये कुजवून त्याचा खत म्हणून वापर केल्यास जादा उत्पन्न मिळणार आहे. येथील शेतक-यांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करावी व यातून जास्तीत जास्त उत्पन्न मिळावे. पुढील वर्षीही जिह्यातील ऊस लागवड क्षेत्रामध्ये या यंत्राद्वारे ऊस तोडणी करण्यास प्राधान्य देणार आहोत. यासाठी जिल्हा बँक, डी. वाय. पाटील साखर कारखाना यांच्या मदतीने हे ऊस तोडणी यंत्र उपलब्ध करण्याची ग्वाही शेतकऱयांना सावंत यांनी दिली. जि. प. माजी अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, माजी उपसभापती छोटू ठाकूर, मसुरे सरपंच लक्ष्मी पेडणेकर, समीर प्रभूगावकर व त्यांचे सर्व शेतकरी सहकारी यांच्या प्रयत्नाने मसुरे येथील ऊस शेती वाढत असून भविष्यात 400 ते 500 एकरामध्ये येथील ऊस शेती होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये अशाप्रकारच्या यंत्राद्वारे ऊस तोडणी केली जाते. येथील सुमारे 150 एकर क्षेत्र ऊस लागवडीखाली आहे. मशीनच्या सहाय्याने ऊस तोडणी होत असल्याने शेतक-यांमध्ये समाधान आहे. मजुरांच्या टंचाईची समस्या दूर झाल्याने उर्वरित शेत जमिनीमध्येही ऊस लागवड करण्यास शेतकऱयांना प्रोत्साहन मिळाले आहे. मसुरे येथील गजबजलेली गुळाची गु-हाळे मध्यंतरीच्या काळात लुप्त झाली होती. भविष्यात ती पुन्हा दिसू लागल्यास नवल वाटायला नको. मसुऱयातील गुळाला मुंबई, कोल्हापूर, पुणे, कारवार येथे त्याकाळी मोठी मागणी होती. येथील गुळाची पापडी प्रसिद्ध होती. शेतकरी पुन्हा ऊस लागवडीकडे वळल्याने पुन्हा गुळ व पापडी या उद्योगातही प्रगती करण्याची शक्यता आहे. 2011 मध्ये मसु-यात 22 एकर क्षेत्रामध्ये ऊस लागवड होत होती. संग्राम प्रभूगावकर, समीर प्रभूगावकर यांनी सर्व प्रथम शेतकरीवर्गामध्ये ऊस शेतीबाबत जनजागृती केली. आता हेच लागवड क्षेत्र 125 एकरापर्यंत पोहोचले आहे. या वर्षी सुमारे मसुरे येथून साडेतीन हजार टन ऊस कारखान्यात जाणार आहे. यातून शेतक-यांना सुमारे 80 ते 90 लाख रुपयांचे सरासरी उत्पन्न मिळणार आहे. एका एकरमध्ये कमीत कमी 35 ते 40 टन ऊस उत्पादन होत असून गतवर्षी प्रभूगावकर बंधूंनी मेहनत घेत हेच उत्पन्न 65 टनापर्यंत नेले होते. संग्राम प्रभूगावकर यांनी पितांबरी कंपनीशी बोलणी करून येथील ऊस या कंपनीलाही चांगल्या दराने नेण्याचा प्रयत्न केला आहे. हे ऊस तोडणी यंत्र मसुरे येथे आणण्यासाठी सतीश सावंत यांच्याकडे प्रभूगावकर बंधूंनी पाठपुरावा केला होता. भविष्यात येथील ऊस उत्पादक शेतक-यांसाठी चर्चासत्र आयोजित करून ऊस शेतीतील तज्ञांना मार्गदर्शन करण्यासाठी आणण्यात येणार असल्याची माहिती सावंत यांनी दिली.