Breaking News

मिलिंद एकबोटेंना जामीन मंजूर

पुणे : कोरेगाव भीमा प्रकरणात हिंसाचार घडविल्याचा आरोप असलेल्या मिलिंद एकबोटेंना जामीन मंजूर करण्यात आला आहे..पुणे सत्र न्यायालयाने एकबोटेंना जामीन मंजूर केला आहे. कोरेगाव भीमामध्ये हिंसाचार घडविल्याच्या आरोपात मिलिंद एकबोटेंना अटक झाली होती. 25 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्मयावर एकबोटेंना जामीन मंजूर झाला आहे. 1 जानेवारीला रोजी कोरेगाव भीमा येथे शौर्य दिना निमित्ताने वंदन करण्यासाठी आंबेडकरी अनुयायी जमले होते. त्यावेळी कोरेगाव भीमा गावच्या हद्दीतील वढु रोड, डीग्रहजवाडी रोड, पुणे-नगर महामार्ग या ठिकाणी उसळलेल्या दंगलीमध्ये दगडफेक, जाळपोळीची घटना झाली होती.