Breaking News

गावांत मोफत होमिओपॅथिक उपचार व सल्ला केंद्र सुरु करणार - मोरे

जामखेड / ता. प्रतिनिधी । होमिओपॅथिक उपचार पध्दतीचा ग्रामीण भागात प्रचार व प्रसार करून त्याचा जास्तीत जास्त नागरिकांना फायदा व्हावा यासाठी कर्जत जामखेड तालुक्यातील 5 हजार पेक्षा जास्त लोकसंख्येच्या गावात मोफत होमिओपॅथिक उपचार व सल्ला केंद्र सुरु करणार असल्याची माहिती रत्नदीप मेडिकल फाऊंडेशनचे अध्यक्ष भास्कर मोरे यांनी दिली.

रत्नापूर येथील रत्नदीप मेडिकल फाऊंडेशन अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर या संस्थेच्या जामखेड होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये होमिओपॅथिचे जनक डॉ. सॅम्युअल हॅनिमन यांच्या 263 व्या जयंतीनिमित्त जागतिक होमिओपॅथिक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी रत्नदीप फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे, सचिव डॉ. वर्षा मोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बोराडे, ग्रामीण रुग्नालयाचे अधीक्षक डॉ. युवराज खराडे यांच्यासह विधार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.