Breaking News

राज्यात चलन तुटवड्याचा पहिला बळी

ठाणे : पंजाब नॅशनल बँकेचा आर्थिक घोटाळा देशभर गाजत असतानाच चलन तुटवड्याने नागरिक त्रस्त आहेत. त्यातच बँकेने पैसे नाकारल्याने एकाचा बळी गेल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली. या मृत्यूसाठी बँकेला जबाबदार धरत मृताच्या नातेवाईकांनी त्याचा मृतदेह पंजाब नॅशनल बँकेत आणून गोंधळ घातला. गणेश पांडुरंग कांबळे (40) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी परिसरात आपल्या कुटुंबासमवेत राहणारे गणेश गेल्या 3-4 महिन्यांपासून आजारी होते. मुंबईतील केईएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. ते एकटेच घरात कमवते असल्याने नातेवाईकांकडे उपचारांसाठी पैसे नव्हते. मात्र, गणेश यांच्या बँक खात्यात 27 हजार रुपये होते. हे पैसे देण्याची मागणी कुटुंबीयांनी बँकेत जाऊन केली होती.