Breaking News

‘दिव्यांग’ प्रमाणपत्र वाटप शिबिर उत्साहात


संगमनेर येथील भाजप दिव्यांग सेलच्या प्रयत्नातून शासनाच्या आरोग्य विभागाच्यावतीने आयोजित ‘अपंग प्रमाणपत्र वाटप शिबिरा’स प्रचंड प्रतिसाद मिळाला. ७५० दिव्यांग व्यक्तींना याचा लाभ मिळाला.
भाजप दिव्यांग सेलचे तालुकाध्यक्ष विनायक दाभोळकर यांच्या पाठपुराव्यामुळे शासनाच्यावतीने कॉटेज हॉस्पिटल याठिकाणी मंगळवावीर {दि. २४} या शिबिराचे आयोजण करण्यात आले होते. या शिबिरासाठी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत शेकडो दिव्यांग व्यक्तींची तपासणी करण्यात आली. यासाठी नगरहून डॉ. तांदळे, डॉ. पाठक, डॉ. कराळे, डॉ. रासकर, डॉ. घोडके आदी उपस्थित होते. शिबिराच्या आयोजन आणि यशस्वीतेसाठी भारतीय जनता पक्षाच्या दिव्यांग सेलचे तालुकाध्यक्ष विनायक दाभोळकर, शहराध्यक्ष अनिल मालपाणी, सचिन सोनवणे, अरुण सोनवने, सुनील खरे, दिव्यांग सेनेचे जिल्हाध्यक्ष जालिंदर लहामगे, यांनी पुढाकार घेतला. 

शिबिराच्या यशस्वी नियोजनासाठी संगमनेर भाजपचे शहराध्यक्ष राजेंद्र सांगळे, तालुका सरचिटणीस नानासाहेब खुळे, विकास गुळवे, शहर सरचिटणीस दिनेश सोमाणी व सुदाम ओझा, दीपक भगत, किशोर गुप्ता, शिरीष मुळे, शिवकुमार भंगीरे, सीताराम मोहरीकर, भारत गवळी, दीपेश ताटकर, अरुण कुलकर्णी, अरुण थिटमे, दिलीप रावल, राहुल भोईर, जग्गू शिंदे, सोमनाथ नेहे, ज्योती भोर, कांचन ढोरे, रेश्मा खांडरे, निर्मला थोरात, प्राजक्ता बागुल आदींनी प्रयत्न केले.