Breaking News

बसस्थानकावर कॅमेरे बसविण्याची मागणी


राहुरी / ता. प्रतिनिधी :- राहुरी बसस्थानकावरील वाढत्या चो-या व गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी बस स्थानकावर सी.सी.टि.व्ही. कॅमेरे बसविण्यात यावेत तसेच स्थानकातील पोलीस चौकी पुर्ववत सुरू करण्यात यावी अशी मागणी राहुरी शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
मनसे च्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राहुरी बस स्थानकावर प्रवाशी, साई व शनि भक्त, विद्यार्थ्यांंची मोठी गर्दी असते. या गर्दीचा फायदा घेत चोरटे चोरी करतात. पाकीटमार, खिसेकापू यांचा सुळसुळाट झालेला असुन सोनसाखळी व इतर चो-या सर्रास होत आहेत. या चोरीच्या घटना सातत्याने वाढत आहेत. मुलींची छेडछाडीच्याही घटना घडत आहेत. या घटनांमुळे प्रवासी, महिला, शालेय विद्यार्थिनी यांची सुरक्षितता धोक्यात आली असुन, वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी बस स्थानकावर त्वरीत सी. सी. टि. व्ही. कॅमेरे बसविण्याची स्थानकावरील पोलीस चौकी सुरू करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन वाहतुक नियंञक गोसावी यांनी स्विकारले. निवेदनावर शहराध्यक्ष प्रतिक विधाते, उपशहराध्यक्ष विजय पाटील, चरण धागुडे, तात्याराम गिते, राजेंद्र आढागळे, महेश चोथे, सोमनाथ धुमाळ, अनिल गिते, बंटी भालके, सोमनाथ काळे, प्रदिप धनवटे, अक्षय सञे, नितीन पाटील, महेश कोकाटे, मुकेश गरड, रोहित चव्हाण, प्रमोद खेडकर आदिंच्या सह्या आहेत.