शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विखे आणि आम्ही एकत्रच - आमदार शिवाजीराव कर्डीले
राहुरी तालुक्याची कामधेनू डॉ.बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचा सन 2017-18 च्या गळीत हंगामाचा सांगता समारंभ तालुक्याचे आमदार शिवाजीराव कर्डीले यांचे अध्यक्षतेखाली व कारखान्याचे मार्गदर्शक युवानेते डॉ.सुजयदादा विखे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच तालुक्याचे जेष्ठ नेते ॲड.सुभाष पाटील, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश करपे, कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील, व्हाईस चेअरमन शामराव निमसे, तालुका दुध संघाचे चेअरमन, तान्हाजी धसाळ, माजी संचालक उत्तमराव म्हसे, पंढरीनाथ पवार, संचालक नामदेवराव ढोकणे, शिवाजीराजे गाडे, सुरसिंगराव पवार, केशवराव कोळसे, बाळकृष्ण कोळसे, विजय डौले, महेश पाटील, मच्छिंद्र तांबे, दत्तात्रय ढुस, अशोक खुरुद, उत्तमराव आढाव, मधुकर पवार, भारत तारडे, शिवाजी सयाजी गाडे, रविंद्र म्हसे, नंदकुमार डोळस, अर्जुन बाचकर, सुरेश चौधरी, गोरक्षनाथ तारडे, मच्छिंद्र शिंदे, कारभारी डौले, सुखदेव कुसमुडे, बाळकृष्ण बानकर, महेंद्र तांबे, सुरेश भुजाडी, राहुरीचे नगरसेवक सोन्याबापू जगधने, आण्णासाहेब शेटे, कार्यकारी संचालक टि.आर.ढोणे, प्र.कार्यकारी संचालक बी.एन.सरोदे आदींच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी अध्यक्ष स्थानावरुन बोलताना आमदार शिवाजीराव कर्डीले यांनी सांगीतले की, राहुरी कारखाना हा शेतकऱ्यांची व तालुक्याची कामधेनू असल्याने जिल्हा बँकेने जप्ती केल्यानंतरही प्रशासकाच्या माध्यमातून सुरु करणेचा आम्ही प्रयत्न केला. मात्र ते शक्य झाले नाही. कारखाना निवडणुकीत बिनशर्त माघार घेऊन निवडुन येणारांना सहकार्य करणेची घोषणा आम्ही केली. विखेंना मदत केली म्हणजे राजकीय अडचण येऊ शकते, असे अनेकांनी सांगीतले. मात्र आम्ही राजकारणच्या पलीकडे जाऊन शेतकरी व कामगारांच्या हितासाठी प्रतिष्ठा पणाला लावून मदत करण्याचे ठरविले व आम्ही ते केलेही.
कारखाना सुरु करण्यामध्ये नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा मोठा सहभाग आहे. सहकाराला जेव्हा जेव्हा मदतीची गरज असते, त्या-त्या वेळी विखे घराणे पुढाकार घेत असते. हा कारखाना सुरु झाला, एक आमदार म्हणून याचा मला मनस्वी आनंद आहे. स्वत:चे पाप झाकणेसाठी काहींनी कारखान्याबाबत कामगारांवर ठपका ठेवला. मात्र कामगारांचे कारखान्यासाठी मोठे योगदान आहे.
साखरेचा भाव कमी असल्याने जिल्हा बँकेचा हप्ता देणे कठीण आहे, हे आम्ही जाणतो. म्हणून आमदार म्हणून तुमची वकीली मी नक्कीच करेल. कारखाना सुरु झाला नसता तर, टपून बसणारांनी कवडीमोल भावाने ऊस नेला असता. पूढील हंगाम लवकरात लवकर मशिनरी बदलून सुरु करावा व जास्तीत जास्त गाळप करावे. त्यासाठी आवश्यक ते सहकार्य करणेची भावना आमची राहील.
यावेळी डॉ.सुजयदादा विखे यांनी सांगीतले की, अनेकांना आम्ही हा कारखाना सुरु करतो की नाही याबाबत शंका होती. मात्र शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीकोनातून व आम्ही दिलेल्या शब्दाप्रमाणे आम्ही हा कारखाना सुरु केला आहे. कारखाना सुरु करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. मात्र आमच्यावर दैवी कृपा असल्याने कोणत्याही प्रकारचा अपघात न होता हा गळीत हंगाम यशस्वीरीत्या पार पडला. यात सर्वांचे योगदान आहे. नगर जिल्ह्यामध्ये साखर उताऱ्यात आपण तिसऱ्या क्रमांकावर राहीलो, हे सर्वांचे श्रेय आहे. चांगले नेतृत्व लाभल्यास सक्षमपणे काम होते, हे कामगारांनी दाखवून दिले आहे.
सभासद पद जाऊ नये म्हणून खाजगी कारखाना असणारांनीही एक एकर ऊस या कारखान्याला घातला. त्यामुळे अजुनही राजकीय खेळया चालू असल्याचे त्यातुन निदर्शनास आले. मात्र एकदा माझे हातात आलेली गोष्ट मी सहजासहजी जाऊ देत नाही. मी खासदार बाळासाहेब विखे पाटलांच्या तालमीतला पैलवान आहे व नामदार राधाकृष्ण विखे पाटील व आमदार कर्डीले यांचे माझेवर आशिर्वाद आहेत. पुढील राजकीय चाली कशा खेळायच्या ते आम्ही पाहू.
पुढील हंगामात कारखाना सुरु करताना एकच मील मात्र सुस्थितीतील व अद्यावत यत्रणा उभाऊन चालवावी लागणार आहे. उत्कृष्ट नियोजन करुन हा कारखाना चांगला चालू शकतो, असा विश्वास निर्माण केल्यास आर्थीक मदतही होऊ शकते. पुढच्या गळीतास पाच लाखापेक्षा अधिक गळीत केल्यास अनेक अडचणी सुटणार आहेत. आत्ताही उभा असलेला ऊस प्रवरेच्या माध्यतातून आम्ही नेणार आहोत, त्याची चिंता कोणी करु नये.पुढील हंगामासाठी बॉयलरसह अनेक मोठी कामे करावी लागणार आहेत. कमीत कमी पस्तीसशे मे.टन प्रतीदीन कारखाना चालेल याचे नियोजन केले जाणार आहे.
प्रास्तविकात चेअरमन उदयसिंह पाटील यांनी सांगीतले की, सलग तीन हंगामापासून बंद असलेला कारखाना सुरु करण्यासाठी ना.राधाकृष्ण विखे पाटील साहेब,आमदार शिवाजीराव कर्डीले साहेब, डॉ. सुजयदादा विखे पाटील साहेब यांनी तसेच गळीत हंगाम यशस्वी होण्यासाठी संचालक मंडळ,ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, अधिकारी व कर्मचारी यांनी मोठे योगदान दिलेले आहे. त्यांचे ऋण व्यक्त करणे गरजेचे आहे.

हा हंगाम व्यवस्थीतरीत्या पार पडल्याने शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण झालेला आहे. डॉ.सुजयदादांच्या दुरदृष्टीमुळे आर्थीक संकटात असणारी राहुरीची कामधेनू अखेर सुरु झाली व ती भावी काळातही अशीच बहरत राहील, असा आम्हाला विश्वास आहे. शिस्तबद्ध व काटेकोरपणे केलेल्या नियोजनामुळेच हा हंगाम यशस्वी होऊ शकलेला आहे.
यावेळी कामगार युनियनचे अध्यक्ष ज्ञानदेव आहेर यांचेही भाषण झाले. तसेच साखर कामगार युनियनचे वतीने प्रमुख अतिथींसह संचालक मंडळाचा सन्मान करणेत आला. आभार संचालक सुरसिंगराव पवार यांनी मानले. तर सुत्रसंचलन पत्रकार गणेश विघे यांनी केले.
हेड लाईन करायला मला ॲड.सुभाष पाटील यांनीच शिकवले.

त्यांच्याकडून अनेक गोष्टी घेण्यासारख्या आहेत, असे सांगण्यास आमदार कर्डीले यावेळी विसरले नाहीत. त्याचबरोबर राजकारणातही त्यांचे मोठे सहकार्य असल्याचे कर्डीले यांनी आवर्जुन सांगीतले.