Breaking News

बसस्थानकात महिलेच्या पर्समधून तीन तोळ्याच्या गंठणवर हात साफ

जामखेड  येथील बसस्थानकावर महिला प्रवासी बसमध्ये चढत असताना अनोळखी महीलेने पर्समधील तीन तोळे सोन्याचे गंठण चोरून फरार झाली. गेल्या अनेक दिवसांपासून चोरीचे प्रकार बसस्थानकात घडत आहेत. यावरून बसस्थानकावरील सुरक्षिततेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. याबाबत जामखेड पोलिसांत अज्ञात महीलेविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत जामखेड पोलिसांत सुवर्णा चंद्रकात क्षीरसागर (रा. ता. बार्शी जि. सोलापूर) या आपल्या माहेरी टेकाळेनगर, जामखेड येथे मुलगी गितांजली सह चार दिवसांपूर्वी आल्या होत्या. काल सासरी बार्शी येथे जाण्यासाठी जामखेड बसस्थानकावर दुपारी 3.15 वाजता मुलीसह आल्या होत्या. अर्ध्या तासाने मालेगाव - सोलापूर एसटी बस आल्यानंतर बार्शी येथे जाण्यासाठी या बसमध्ये चढत असताना हातातील पर्सला कोणीतरी धक्का दिला, त्यावेळी फिर्यादी महीलेने मागे वळून पाहिले असता पाठीमागे एक महीला लहान बाळ घेऊन बसमध्ये चढत होती. फिर्यादी महिला बसमध्ये बसली असताना तिकीट काढण्यासाठी पर्स पाहिली असता, पर्सची चैन उघडी दिसली. त्या पर्समधील आतल्या कप्प्यातील तीन तोळ्याचे सोन्याचे गंठण दिसले नाही, तसेच सदर अनोळखी महीला बसमध्ये दिसली नाही. त्यामुळे सदर महीलेने सोन्याचे गंठण चोरले आहे. अशी फिर्याद सुवर्णा क्षीरसागर या महीलेने जामखेड पोलिसांत दिली.
जामखेड बसस्थानकात चार दिवसापूर्वीच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. चार जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर जामखेड बसस्थानक आहे. यामुळे या बसस्थानकात रात्रभर बसेस येतात. तसेच प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. दहा दिवसांपासून बसस्थानक आवारातील कंट्रोल रूम बंद आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी बसस्थानक परिसरात महिलांची संख्या जास्त असते. पोलीस चौकीत पोलीस नसल्यामुुळे महिला असुरक्षित राहतात. यामुळे कंट्रोल रूम व पोलीस चौकी कायमस्वरूपी चालू ठेवण्याची गरज या ठिकाणी निकडीची वाटते.