भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कर्जत तालुक्यात उत्साहाचे वातावरण असून, विविध ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करुन भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. कर्जत शहर तर पूर्ण आंबेडकरकरमय झाले होते. रात्री 12 वाजता फटाक्याची आतषबाजी करून आनंद व्यक्त करताना कार्यकर्ते जागोजागी बेधुंद होऊन नाचत होते. कर्जत शहरात अनेक ठिकाणी कर्जत येथे आज डॉ. बाबासाहेबांचे पुतळे वा प्रतिमा उभ्या करून त्यांचे पूजन जलसंधारण मंत्री व पालकमंत्री ना. प्रा. राम शिंदे यांचे हस्ते हार घालून अनेक ठिकाणी अभिवादनाचा कार्यक्रम झाला. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्वात प्रथम बुद्धविहार मध्ये कार्यक्रम पार पडला. यावेळी नगराध्यक्ष नामदेव राऊत, राजेंद्र फाळके, अंबादास पिसाळ, अशोक खेडकर, प्रवीण घुले, सचिन पोटरे, राजेंद्र गुंड, दादा सोनमाळी, काकासाहेब तापकीर, बाळासाहेब साळुंके, उपनगराध्यक्ष बापूसाहेब नेटके, बापू शेळके उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे, नगरसेविका प्रतिभा भैलूमे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समतेची शिकवण दिली असून सर्वांनी एकोप्याने राहावे असे प्रतिपादन ना. प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केले. विविध चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याभोवती अनेक ठिकाणी आकर्षक सजावट करण्यात आली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीमार्फत चार दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य मिरवणूक कर्जत शहरातून काढण्यात आली. यामध्ये बहूसंख्येने युवक कार्यकर्त्यांसह स्त्री पुरुष सहभागी झाले होते.
कर्जतमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
Reviewed by Dainik Lokmanthan
on
10:15
Rating: 5