Breaking News

सद्गुरू नारायणगिरी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त सर्वरोग निदान व उपचार शिबिर


नेवासाफाटा (प्रतिनिधी) - नेवासा बुद्रुक शिवारातील सुरेगाव रस्त्यावर असलेल्या सद्गुरू नारायणगिरी महाराज प्रबोधन प्रतिष्ठानच्या प्रांगणात गुरुवर्य नारायणगिरी महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे निमित्त आयोजित सर्वरोग निदान उपचार शिबिराला पंचक्रोशीतील भाविक भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या शिबिरात दिवसभरात सुमारे 450 रुग्णांची विविध आजाराबाबत मोफत तपासणी करण्यात आली. तसेच उपचारासाठी मार्गदर्शनही करण्यात आले. या शिबिरासाठी लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्टने पुढाकार घेऊन मोठे योगदान दिले प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या विद्यापीठाचे प्रभारी कुलपती डॉ.राजेंद्र विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे उदघाटन प्रतिष्ठानचे प्रमुख व सोहळ्याचे संयोजक उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरामध्ये मेडिसीन, शल्यचिकित्सा, नेत्रचिकित्सा,अस्थिरोग,स्त्रीरोग,बालरोग,दंतरोग चिकित्सा,हिमोग्लोबिन आदींची तपासणी वरील आजारांवरील तज्ञ डॉ.कर्नल अमिताभ चटर्जी, डॉ. पंकज बडोले,डॉ.वैष्णवी देशमुख,डॉ.राजीव चटर्जी, डॉ. दिलीप अपदुलकर,डॉ.अभिमन्यू कडू, डॉ.नितीन घुले, डाॅ.अमित कामत यांनी केली . यावेळी प्रशासकीय अधिकारी प्रताप देवकर, विलास घुले, मेडिकल सोशल वर्कर दीपक काळे यांच्यासह सुमारे नव्वद आरोग्य सेवक कर्मचारी यांनी शिबिर यशस्वी होण्यासाठी विशेष योगदान दिले. शिबिर उदघाटन प्रसंगी सोहळ्यातील सेवेकरी इंजिनियर नगरसेवक सुनील वाघ,शिल्पकार बजरंग ईरले,प्रा.मुरलीधर कराळे,प्रा.रामनाथ नन्नवरे,गणेश डोंगरे, बाळासाहेब झिने,सागर वांढेकर , नानासाहेब पाटील, सागर महाराज आधाने, महेश गवळी, महेंद्र महाराज शेजुळ उपस्थित होते.