जयेश सावंत यांची निवड
श्रीरामपूर / शहर प्रतिनिधी / - महाराष्ट्र पञकार संघाचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष देविदास बैरागी यांच्या आदेशानुसार, जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय खेमनर यांनी श्रीरामपूर येथील एस न्यूज मराठी वृत्तवाहिनीचे संपादक जयेश सावंत यांची इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड केली आहे. जयेश सावंत हे मागील अनेक वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात काम करत आहेत. त्यांच्या निवडीबद्दल जिल्हाध्यक्ष दत्तात्रय खेमनर, जिल्हा सचिव राजेंद्र बनकर, जिल्हा संपर्क प्रमुख साईप्रसाद कुंभकर्ण, जिल्हा कार्यध्यक्ष राजेंद्र उंडे, राहुरी तालुकाध्यक्ष राजेंद्र साळवे, बाबासाहेब वाकचौरे, भरत थोरात, श्रीरामपूर शहराध्यक्ष राजेश बोरुडे आदींनी अभिनंदन केले आहे.