भेंडा ( प्रतिनिधी ) :- नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथे पशुवैद्यकीय दवाखाना, कुकाणा अंतर्गत पशू वैद्यकीय नियत भेट केंद्र सुरु करण्यात आले. भेंडा येथे मोठ्या प्रमाणात पशुधन व दुग्ध व्यवसाय असून ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माध्यमातून ऊसतोडणी कामगारांचे बैल व इतर पशुधन असे सुमारे 4 ते 5 हजार पशुधन असल्याने स्वतंत्र पशुवैद्यकीय दवाखाना व्हावा अशी मागणी सातत्याने होत होती. त्याची दखल घेऊन जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा राजश्रीताई घुले व जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे यांनी या मागणीचा पाठपुरावा केला. पशुसंवर्धन व दुग्धविकास समितीचे सभापती सुनील फटांगरे व जिल्हा पशुधन अधिकारी डॉ.तुंभारे यांनी स्वतंत्र पशुवैद्यकीय दवाखाना सुरू होईपर्यंत भेंडा येथे पशुवैद्यकीय दवाखाना नियत भेट केंद्राला मंजूरी दिली आहे. आठवड्याच्या प्रत्येक सोमवार व बुधवार हे दोन दिवस या केंद्रातून सेवा मिळणार आहे. भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालय जुन्या इमारतीमध्ये या केंद्राचे उदघाटन जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे यांचे हस्ते झाले. यावेळी पंचायत समिती माजी उपसभापती तुकाराम मिसाळ, पंचायत समिती सदस्य अजित मुरकुटे, बाजार समितीचे संचालक डॉ.शिवाजी शिंदे, माजी सरपंच गुलाबराव आढागळे, सोसायटीचे माजी अध्यक्ष नामदेव निकम, अण्णासाहेब गव्हाणे, ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र काळे, गोटीराम गव्हाणे, बाळासाहेब वाघडकर, अंबादास गोंडे, किशोर मिसाळ, भाऊसाहेब गोरे,गंगाराम बोरुडे,बाबासाहेब गोर्डे,विष्णू फुलारी, रामभाऊ देशमुख, कुकाणा केंद्राचे पशुधन विकास अधिकारी डॉ. मनोज शिंदे, रुग्ण उपचारक ज्ञानदेव गरड, परिचारक संजय कदमआदी यावेळी उपस्थित होते.
भेंड्यात पशुवैद्यकीय दवाखाना नियत भेट केंद्र सुरू
Reviewed by Dainik Lokmanthan
on
09:45
Rating: 5