Breaking News

आमदार राजन साळवी यांना अटक


रत्नागिरी : नाणार रिफायनरीविरोधात तीव्र आंदोलन केल्याप्रकरणी शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांना अटक करण्यात आली आहे. राजापूर पोलिसांनी त्यांच्यावर ही कारवाई केली आहे. मनाई आदेशाचा भंग करत राजन साळवी यांनी रिफायनरीविरोधात आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान राजन साळवी यांनी सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळला होता. राजन साळवी हे राजापूर-लांजा मतदारसंघाचे आमदार आहेत. साळवी यांच्यासह पंचायत समिती सभापती सुभाष गुरव, उपसभापती अश्‍विनी शिवणेकर, तालुका प्रमुख प्रकाश कुवळेकर यांच्यासह प्रमुख पदाधिकार्‍यांना देखील अटक करण्यात आली आहे.