Breaking News

संशयीत दहशतवाद्यांचा कार घेऊन पोबारा


पठाणकोट : दहशतवादी हालचालींची माहिती मिळाल्यानंतर पंजाबच्या सीमावर्ती भागात विशेषत: पठाणकोट जिल्ह्यात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. दहशतवाद्यांना शोधण्यासाठी शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. आज सकाळी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे लष्कराने सीमावर्ती भागात विविध ठिकाणी शोधमोहिम सुरू केली. दहशतवादी लपून बसण्याची शक्यता असलेली आयटीसी इमारत तपासण्यात आली. रात्री मस्कीन अली नावाच्या यांच्याकडे दोन व्यक्तींनी लिफ्ट मागितली. लिफ्ट मागणारे दोघे लष्काराच्या गणवेशात होते. सैन्यातील समजून मस्कीन अली याने त्यांना लिफ्ट दिली. पण नंतर हे सैन्यातील नाही हे अली यांना समजले. अली यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केल्यावर त्या दोघांनी अली यांच्यावर हल्ला केला आणि कार घेऊन पळ काढला. मस्कीन यांनी तातडीने घटनेची माहिती पोलिसांना दिली. मागील 3-4 दिवसांपासून या भागात दहशतवाद्यांच्या हालचाली असल्याची माहिती मिळत आहे. आम्ही शोधमोहिम सुरु केली आहे, पण संशयास्पद असे काही आढळून आलेले नाही, अशी माहिती सीमावर्ती भागाचे महानिरीक्षक एसपीएस परमार यांनी दिली.