Breaking News

भारतीय हाॅकी संघांचा धडाकेबाज विजय


भारताच्या युवा हाॅकी संघाने मंगळवारी यूथ अाॅलिम्पिकच्या पात्रता फेरीमध्ये धडाकेबाज विजयाची नाेंद केली. भारताच्या पुरुष संघाने सलामीच्या सामन्यात थायलंडवर माेठ्या फरकाने मात केली. भारताने २५-० अशा फरकाने सामना जिंकला. माे. अलिशानने संघाच्या विजयात सर्वाधिक ६ गाेलचे याेगदान दिले. तसेच राहुल कुमारने पाच गाेल अाणि रवींद्र माेरइंगथमने चार गाेलचे याेगदान दिले. त्यामुळे भारतीय पुरुष संघाला माेठा विजय संपादन करता अाला. याशिवाय कर्णधार विवेक प्रसादने संघाच्या विजयासाठी चार गाेलची महत्त्वपूर्ण खेळी केली. अाता भारताचा दुसरा सामना गुरुवारी जपानशी हाेईल.