Breaking News

शिक्षकांच्या बदल्या अाॅनलाइनच


जिल्हा परिषद शिक्षकांच्या अाॅनलाइन बदली धोरणाला उच्च न्यायालयानेही दुजोरा दिला अाहे. त्यामुळे बदल्यांत राजकीय हस्तक्षेपाला अाळा बसून ही प्रकिया संपूर्णपणे पारदर्शी राबवली जाईल. शिक्षकांवर काेणत्याही अन्याय हाेणार नाही, असे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी बुधवारी शिक्षक संघटनांसोबत झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.