Breaking News

पाकच्या गोळीबारात दोन जवान शहीद

श्रीनगर, दि. 11, एप्रिल - पाकिस्तानकडून सीमेवर पुन्हा एकदा मंगळवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. यामध्ये पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात दोन भारतीय जवान शहीद झाले आहेत. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील सुंदरबनी सेक्टरजवळ केलेल्या या गाळीबाराला भारतीय सुरक्षा रक्षकांनी सडेतोड उत्तर दिले आहे. पाकिस्तानकडून छोटी शस्त्रे, ऍटोमॅटिक उखळी तोफांचाही हल्ल्यासाठी वापर करण्यात आला. सुंदरबनी सेक्टरजवळील भारतीय चौक्मयांना पाकिस्तानी सैन्याने टार्गेट केले होते. मंगळवारी पहाटे सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास हा गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानच्या या कारवाईला भारतीय सैन्याने सडेतोड उत्तर दिले आहे.