Breaking News

नरोडा पाटिया दंगल : माया कोडनानी दोषमुक्त बाबू बजरंगीची जन्मठेप कायम

अहमदाबाद - नरोडा पाटिया दंगल प्रकरणी गुजरात उच्च न्यायालयाने माजी मंत्री आणि भाजप नेत्या माया कोडनानी यांना दोषमुक्त केले आहे. तर बजरंग दलाचा नेता बाबू बजरंगी याची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे. न्यायमूर्ती हर्षा देवानी आणि न्यायमूर्ती एस. एस. सुपेहिया यांच्या खंडपीठाने याप्रकरणाची सुनावणी ऑगस्ट 2017ला पूर्ण केली होती.

ऑगस्ट 2012मध्ये एसआयटी प्रकरणी विशेष न्यायालयाने माजी मंत्री आणि भाजप नेत्या माया कोडनानीसह 32 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. कोडनानीस 28 वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. बहुचर्चित आरोपी आणि बजरंग दलाचा माजी नेता बाबू बजरंगी याला जन्मठेपेची शिक्षा झाली. इतर 7 आरोपींना 21 वर्षाच्या जन्मठेपेची व अन्य आरोपींना 14 वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. 
2002 मधील बहुचर्चित नरोदा पाटिया खटल्याचे 11 साक्षीदार घटनेच्या वेळी हजर होते, हे सिद्ध करू शकले नाहीत, त्यामुळे माया कोडनानीची दंगलीतली भूमिका सिद्ध झाली नाही. पुराव्याअभावी माया कोडनानीची सुटका झाली. या प्रकरणात विशेष न्यायालयानं भाजपा आमदार माया कोडनानी आणि बाबू बजरंगीसह 32 जणांना दोषी ठरवले होते.