आसारामला तुरुंगातच शिक्षा सुनावण्याचे आदेश
राजस्थान उच्च न्यायालयाने लैंगिक शोषणाचा आरोपी आसारामच्या शिक्षेचा निकाल तुरुंगातच देण्याचे आदेश बजावले. न्या. गोपाल कृष्ण व्यास यांच्या पीठाने मंगळवारी पोलिस प्रशासनाकडून दाखल याचिकेवर हा निर्णय दिला. याचिकेत म्हटले होते की, कायदा-सुव्यवस्था कायम राखणे व हरियाणातील पंचकुलात राम रहीमच्या शिक्षेवेळी बिघडलेल्या स्थितीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आसाराम प्रकरणाची शिक्षा तुरुंगातच सुनावण्यात यावी. या प्रकरणी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने निकाल राखून ठेवला व मंगळवारी शिक्षा सुनावण्याचे आदेश दिले.