Breaking News

काष्टी जनावरे बाजारात आरओ फिल्टरचे शुद्ध पाणी सुरू

बाजार समितीचे उपबाजार काष्टी येथे जनावरे बाजारात बसविणेत आलेल्या आर.ओ. फिल्टरचे उद्घाटन माजी मंत्री बबनराव पाचपुते व नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांचे हस्ते करणेत आले. 
यावेळी नागवडे म्हणाले की, काष्टी जनावरे बाजार सन 1970 पासुन बाजार समितीच्या नियंत्रणाखाली चालत असुन बाजार समितीने बाजारामध्ये अनेक सुविधा निर्माण केलेल्या आहेत. त्यामध्ये आज सुरु केलेली अल्प दरामध्ये आर.ओ. फिल्टरचे पाणी योजना नक्कीच चांगली आहे.

तसेच पाचपुते म्हणाले की, काष्टी येथे जनावरे बाजारामुळे काष्टी गावच्या वैभवात भर पडली असुन जनावरे बाजारात महाराष्ट्रासह इतर राज्यातुन शेतकरी, व्यापारी जनावरे खरेदी विक्रीसाठी येत असतात. बाजार समितीने केलेले 600 वृक्षांचे वृक्षरोपणामुळे मोठी सावली निर्माण होणार असुन निसर्गरम्य ठिकाण पुढील काळात प्रसिद्ध होईल. आर.ओ. फिल्टरचे थंड पाणी 2 रुपये लिटर व जनावरांना पिण्यासाठी 5 रुपयामध्ये 20 लिटर पाणी मिळणार असुन त्यामुळे शेतकरी, व्यापार्‍यांची चांगली सोय निर्माण झालेली आहे. बाजार समितीचे काष्टी बाजारामध्ये उपसभापती वैभव पाचपुते यांनी विशेष लक्ष देऊन बाजारामध्ये अधिकाधिक सोईसुविधा निर्माण करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे शेतकरी/व्यापार्‍यांची संख्या वाढलेली आहे. काष्टी गावचे नाव जनावरे बाजारामुळे देशामध्ये घेतले जात आहे. 
आर.ओ. फिल्टरच्या शुद्ध पाण्याचा लाभ बाजारामध्ये येणार्‍या सर्व घटकांनी घ्यावा व बाजारामध्ये काही अडचणी असल्यास बाजार समितीचे काष्टी येथिल कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन बाजार समितीचे उपसभापती वैभव पाचपुते यांनी केले.
यावेळी जि.प. सदस्य सदाआण्णा पाचपुते, माऊली पाचपुते, राकेश पाचपुते, जिजाबापु रोडे, लक्ष्मण नलगे, विठ्ठल पाचपुते, शहाजी भोसले, सयाजी पाचपुते, आबासाहेब कोल्हटकर, महेश दरेकर, दिलीप चौधरी, बाजार समितीचे सभापती धनसिंग भोयटे, उपसभापती वैभव पाचपुते, सचिव दिलीप डेबरे, बाजार समितीचे सर्व संचालक व कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य, व्यापारी, शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन संचालक सतिष पोखर्णा यांनी केले.