Breaking News

महानिर्मितीचे संच बंद करून कोळसा कंपन्यांना देणार

भुसावळ व नाशिक औष्णिक केंद्रातील २१० मेगावॅट क्षमतेचे दोन वीजनिर्मिती संच तब्बल आठ महिने बंद करून या संचांसाठीचा कोळसा खासगी वीजनिर्मिती उद्योगांना देण्यासाठी महानिर्मितीने २१ एप्रिल रोजी करार केला. एमओडीनुसार (मेरिट ऑफ डिस्पॅच) किफायतशीर दरात वीजनिर्मिती होत असूनही या करारामुळे महानिर्मितीच्या वीज निर्मितीवर परिणाम होणार आहे. 

नाशिक (एकलहरे) व भुसावळ (दीपनगर) औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील २१० मेगावॅट क्षमतेचे संच गेल्या अनेक वर्षांपासून किफायतशीर दरात वीजनिर्मिती करत आहे. भुसावळच्या संचातून ३ रुपये २५ पैशांवरून ३.१८, तर नाशिकच्या केंद्रातून ४.५० पैशांवरून ३.२७ पैसे प्रतीयुनिट विजेचे दर कमी करण्यात आले. एमईआरसीने महानिर्मितीला दिलेल्या नियमांनुसार एमओडीमध्ये वीजनिर्मिती होत असूनही हे संच आगामी आठ महिन्यांसाठी बंद करुन त्यांचा कोळसा मोठ्या खासगी कंपन्यांसाठी आवंटीत करण्यात येणार आहे.