Breaking News

वीजयंत्रणेपासून सुरक्षित दिवाळी साजरी करण्याचे आवाहन

पुणे, दि. 18, ऑक्टोबर -वीजयंत्रणेपासून धोका निर्माण झाल्यास महावितरणच्या 1912 किंवा 18002003435 किंवा 18002333435 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे  आवाहन. एमपीसी न्यूज - दिवाळी सणाला सुरवात झाली असून सार्वजनिक वीजयंत्रणेपासून तसेच घरगुती रोषणाईच्या विद्युत उपकरणांपासून सुरक्षित दिवाळी साजरी करण्याचे  आवाहन महावितरणने केले आहे. दरम्यान, दिवाळी सणाच्या कालावधीत अखंडित वीजपुरवठा कायम ठेवण्यासाठी महावितरणच्या अभियंता, कर्मचारी यांना सज्ज व सतर्क राहण्याच्या  सूचना मुख्य अभियंता एम. जी. शिंदे यांच्याकडून देण्यात आलेल्या आहेत.महावितरणची वीजयंत्रणा ही सार्वजनिक ठिकाणी आहे. यात उच्च आणि लघुदाबाच्या उपरी वीजवाहिन्या,  रोहित्र, फीडर पिलर आदी यंत्रणा उघड्यावर असल्याने फटाके फोडताना त्यापासून सुरक्षित अंतर ठेवावे. फटाक्यांच्या आतषबाजीत सार्वजनिक वीजयंत्रणेला आगीचा धोका निर्माण  होणार नाही, याची काळजी घ्यावी. रोहित्र किंवा फिडर पिलरपाशी टाकलेल्या कच-याजवळ फटाके फोडू नयेत किंवा तो कचरा पेटवून देण्याचे प्रकार टाळावेत. वीजवाहिन्यांना स्पर्श  होईल किंवा त्यापासून धोका होईल असे प्रामुख्याने रॉकेटसारखे फटाके वाहिन्यांखाली उडवू नयेत. मोकळ्या जागेतच फटाके उडावावेत. वीजयंत्रणेला आग लागल्यास, तसा धोका  निर्माण झाल्यास किंवा वीजपुरवठा खंडित झाल्यास महावितरणच्या 24ु7 सुरु असणा-या कॉल सेंटरच्या 1912 किंवा 18002003435 किंवा 18002333435 या टोल फ्री  क्रमांकावर संपर्क साधावा.