Breaking News

‘त्या’ वायरमनची तडकाफडकी उचलबांगडी


पैठण : नायगाव व परिसरातील शेतकऱ्यांनी सोमवारी सुरू केलेल्या तीन तासांच्या आमरण उपोषणाचा दणका बसताच खडबडून जागे झालेल्या विज वितरण कंपनीने अरेरावी व मनमानी कारभार करणाऱ्या मुजोर वायरमन महेंद्र बळीराम इंगळेंची तडकाफडकी उचलबांगडी (बदली ) केली. 

इंगळेंकडे आपेगाव शाखेतंर्गत नायगाव, श्रीक्षेत्र वडवाळी व वाघाडी येथील पदभार होता. आता वादग्रस्त वायरमन इंगळेंची रवानगी आनंदपूर, श्रृंगारवाडी येथे करण्यात आली आहे. सहायक अभियंता साखरे यांनी याबाबतचे लेखी पत्र दिल्यानंतरच शेतकऱ्यांनी उपोषण थांबविले. या उपोषणात महिला शेतकरी मुक्ताबाई डोंगरे यांच्या सह मधुकर गिरगे, ॠषीकेश उगले, आबासाहेब गिरगे, एकनाथ काळे, प्रकाश गिरगे, संतोष कूचे, दत्तात्रय गिरगे, वसंत उगले, डिगांबर गिरगे, शिध्देश्वर उगले, लखन लोखंडे, बाबासाहेब उगले, तिर्थराज गिरगे, शिवाजी खवले, भाऊसाहेब उगले, रवींद्र लोखंडे, अर्जुन पाचे, बाळू गिरगे, नारायण बागरे, सोमनाथ कदम आदी सहभागी झाले होते.