Breaking News

प्लॅस्टिक पिशवी नको रे भाऊ !


शिर्डी/(किशोर पाटणी):  महाराष्ट्रात राज्यसरकारने प्लॅस्टिक बंदीचा निर्णय घेऊन त्याची अमलबजावणी ही सुरु केली असली तरीत्याची अमलबजावणी गंभीरपणे होण्याची गरज निर्माण झाली असून त्याला प्रतिसाद नागरिक देत असले तरी त्यासाठी लोकांची मानसिकता निर्माण होण्यास आणखी काही काळ लागेल असाच काहीसा सूर व्यापारी वर्गातून ही दिसून येतो शासनाच्या निर्णयालाजरी उत्पादक कंपन्यांनी विरोध केला असला तरी नागरिकांना ही झालेली सवय सोडण्यासाठी काही काळ जावा लागेल असेच काहीसे चित्र शिर्डीसह राहाता तालुक्यात दिसून येत आहे.

नागरिक बाजारात जाताना १५ ते २० वर्षापूर्वी पिशवी घेऊन बाहेर पडत मात्र काळ बदलला ज्याठिकाणी खरेदी केली त्याच ठिकाणी खरेदीनंतर आर्कषक अशा प्लॅस्टिक पिशवीत पॅकिंग केलेल्या वस्तू मिळू लागल्या आणि त्याची सवयच महिला वर्षासह नागरिकांना ही मोठ्या प्रमाणावर झालेली होती त्याचा इतका काही अतिरेक झाला की त्या नष्ट कसा करायच्या असा प्रश्न नगरपंचायत नगरपालिका व महानगरपालिकांना ही पडलेला होता. सहजासहजी या प्लॅस्टिक पिशव्या नष्ट होत नाही जर सांडपाण्याच्या गटारीत वाहत गेल्या तर त्या पाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर अडवतात काही नागरिकांनी आपल्या दुचाकीच्या वाहनातच एक पिशवी ठेवलेली दिसून येत आहे. हा सुद्धा होणारा मोठा बदल आहे शिर्डीतील व्यापारी ही साईभक्तांना समजावून सांगत आहे त्यामुळे लगतच्या काळात याचे फायदे दिसून येतात या अगोदर भाजी खरेदी किंवा फळे खरेदीसाठी गेल्यानंतर ग्राहक पिशवीची मागणी करीत होता व त्याला ही सहजपणे उपलब्ध होत होती आता मात्र हे विक्रेतेही बंदीची आठवण करून देत असल्याने नागरिकांची मानसिकता तयार होण्यास मोठा हातभार लागणार आहे.

मेडिकलच्या दुकानात ही औषधे कागदी पिशवीत टाकून दिले जात असे काही ठिकाणी नागरिकांनी मोकळी पाण्याची बाटली परत देऊन एक रु.ची मागणी केली असता कोणी ही सहजपणे एक रु. देण्यास तयार नाही. शासनाने मात्र तशा सूचना केल्या होत्या तसेच या अगोदर परमिट रूम वाईन शॉपी याठिकाणी येणाऱ्या ग्राहकाने या अगोदर त्या पिशवीत दिल्या जात होत्या आता मात्र त्यास काही ठिकाणी नकार दिला जात असल्याने ग्राहकच जाताना बरोबर पिशवी घेऊन जात असल्याचे चित्र असले तरी प्लॅस्टिक पिशवीच्या बाबतीत आणखी कडक संबंधित विभागाने घेतले तर त्याचे चांगले परिणाम व शासनाचा हेतू सफल होईल असे म्हणावे लागेल.