अल्पवयीन मुलीची छेड ; गुन्हा दाखल
देवळाली प्रवरा येथील अल्पवयीन विद्यार्थीनीची छेडछाड काढण्यात आल्याची घटना घडली. या घटनेमळे मुलींमध्ये घबराट पसरली. या मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार तुकाराम अनिल पवार या तरुणाच्या विरोधात राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
यात तुकाराम पवार याने शाळेच्या मुलीला काहीही कारण नसतांना पाठलाग करुन ‘तू माझ्यावर नाराज आहे का, तु काय करते,’ असे म्हणत मुलीकडे पाहून शिट्टी मारत या विद्यार्थिनीचा विनयभंग केला. या घटनेचा तपास पोलिस निरिक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास स. फौ. शेलार करत आहेत.