शिरापुर यात्रेत आज पहावयास मिळणार कुस्त्यांचा थरार
जिल्हा परिषदेचे माजी सभापती विद्यमान जिल्हा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष मधुकर उचाळे यांच्या मार्गदर्शनाने होत असलेल्या महाराष्ट्रात प्रसिध्द असलेल्या शिरापुरचा कुस्त्यांचा आखाडा आज रोजी होत असुन या कुस्त्यांच्या आखाड्यात देशातून, राज्यातून अनेक नामवंत मल्ल दाखल होत आहे. पंजाब, हरियाना, दिल्ली, राजस्थान या राज्यातून मल्ल दाखल होतात व लाखो रुपयांचे बक्षिस घेवून जातात.
जिल्हा परिषदेचे माजी सभापती मधुकर उचाळे यांच्या नियोजनात, मार्गदर्शनाखाली हा कुस्त्यांचा आखाडा चालतो. यामध्ये गावातील मल्ल व कोल्हापुर येथे प्रशिक्षण घेतलेले मल्ल दाखल होतात. या आखाड्यात कुस्ती खेळणे म्हणजे या पहिलवानांचे भाग्य असते. गावातील 200 ते 300 मल्ल हे कोल्हापुर येथे कुस्ती प्रशिक्षणासाठी कोल्हापुरला दाखल होवून येतात व पारनेर, शिरुर, जुन्नर, आंबेगांव, खेड, श्रीगोंदा, अहमदनगर येथे शिरापुर गावाचे पहिलवान म्हणुन तेथील आखाड्यात आपले व आपल्या शिरापुर गावचे नावलौकिक करतात.
अशा या आखाड्याची सिध्देश्वर यात्रेनिमीत्त संपुर्ण जय्यत तयारी झाली आहे. या आखाड्यातील कुस्ती पाहण्यासाठी महाराष्ट्रातून लोक, नेतेमंडळी, दाखल होतात. यावर्षी शिरापुर केसरी म्हणुन म्हैस बक्षिस देण्यात येणार आहे. कुस्तीगीर पहिलवानासाठी व प्रेक्षक नेतेमंडळी, ग्रामस्थ यांची बैठक व्यवस्था व चहा पाणी, जेवण व्यवस्था ठेवण्यात आली आहे. या शिरापुर कुस्त्यांचा थरार पाहण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शिरापुर ग्रामस्थांनी केले आहे.