Breaking News

चांदेकर ! उघडा डोळे वाचा नीट...

श्री. सुधीर चांदेकर आपण लिहीता की श्री. संजय गाते हेच कायदेशिर अध्यक्ष आहेत व त्यांची मुदत 2020 पर्यंत आहे तर धर्मदाय आयुक्त कार्यालय पुणे यांच्या कार्यालयाचे तसे पत्र आपल्याला महाराष्ट्र राज्यातील कुंभार समाजाला दाखवण्यास काय हरकत आहे. आपण स्वर्गवासी तसेच हयात असणार्‍या सभासदांच्या खोटया सह्या मारुन श्री. सुरेशजी हिरे व त्यांच्या बगल बच्चेकंपनी यांचा आपण चेंज रिपोर्ट दाखल केला आहे कि नाही? तुम्हाला आमच्या खोटया सही करण्याचा अधिकार कोणी दिला होता? सोलापूर येथे श्री. सुरेश हिरे अध्यक्ष व आपला भाऊ सचिव म्हणून यांची दोन वर्षासाठी निवड करण्यात येऊन महासंघाच्या घटने प्रमाणे दोन वर्षांत महाराष्ट्र राज्यातील सर्व संस्थाना 5000 हजार रुपये भरुन घेऊन संस्थाना सभासद बनवायचे होते व त्या संस्थानी सर्वमताने प्रत्येकी एक सभासदाला महासंघावर पाठवायचे होते. पाठवलेल्या सभासदातून महासंघाची राज्य कार्यकारिणी निवडायची होती. श्री. सुधिर चांदेकर आपण श्री. संंजयजी गातेंची फसवणूक करून त्यांचे राजकीय जिवन बरबाद करीत आहात.आपल्या भरोशावर ते सर्व शासकीय कार्यालयात महासंघाच्या लेटर हेडवर पत्र व्यवहार करत आहेत, त्याचे पुरावे आमच्या जवळ आहेत आम्हाला कोणाचे नुकसान करायचे नाही. परंतु आमचा  अंत पाहु नका आपल्या चुकीमुळे महासंघाचे आम्ही मुळ सभासद असूनही आम्हाला आज नवीन लोकांकडून महासंघ काय आहे हे शिकवले जात आहे. 20 वर्ष महासंघाचे सचिव पद बळकाऊन तुम्ही कुंभार समाजाशी राजकारण करून समाजाच्या जिवावर घर खर्च चालवत आहात, आमच्या सारखे बाजूला होऊन दाखवा समाजालाही कळू दया आपण कष्ठ करुन आपल्या मुला बाळाना सांभाळू शकता आम्हाला पदाची काही आवश्यकता वाटत नाही., परंतु महासंघाचे मुळ सभासद म्हणून आम्हाला बोलावले जावे आमचा ईतका अधिकार नक्कीच आहे.तुम्हीच सांगा आम्हाला श्री सुरेशजी हिरे यांचा चेंज रिपोर्ट दाखल झाल्यानंतर नोटीस पाठवून समोर बोलावून धर्मदाय कार्यालयातील अधिक ारी यांनी विचारना करून सही घेतली आहे काय ?श्री सुधीरजी चांदेकर आपण 5 मार्चच्या अगोदर श्री विठ्ठलराव राऊत याना शब्द दिला तम्हीच अध्यक्ष आहात जे काय करायचे तुम्हीच करा मग श्री.संजयजी गाते यांनी वर्धा येथे अध्यक्ष म्हणून मिटिंग कोणत्या अधिकाराने लावली व तेथील मिटिंग मध्ये पुर्णपणे माहिती न घेता मुंबई येथील ईंदु मिलच्या पंचवीस हजार फुट जागा गोरोबा काका मं दिराला मागणी करताना जर 1,2,आशा किती मिल आहेत त्या ठिकाणाची योग्य माहिती दयायला हावी होती कारण पेरच्या बातमीत नक्की ठिकाण कळत नाही नक्की ठिकाण कळले आसते तर वाद वाढला नसता.चुकीला चुकीचे मानायला काय हरकत आहे.आत्ता झाले ते पुरे झाले आसे मला वाटते जे काही करायचे ते मंदिर ज्या ठिकाणी आहे त्याना करु दयावे बाहेरच्या समाज बांधवांनी जाऊन फुक टचा वाद महासंघाचे नाव नाव घेऊन वाढवू नये.मी महासंघाचा मुळ सभासद म्हणून अधिकाराने लिहीत आहे.महासंघाला चांगले दिवस यावेत.महासंघाचा महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक कुंभार समाज बांधवाला अभिमान वाटावा. महासंघाला पैशाची मदत करणार्‍याला त्यांनी दिलेल्या पैशाचा हिशोब मिळाला पाहिजे असा महासंघ आम्हाला अपेक्षित आहे.


आपला 
रंगनाथ सुर्यवंशी 
मुळ सभासद 
महाराष्ट्र कुंभार समाज महासंघ पुणे