Breaking News

जिव्हाळा, विश्‍वदीप फौंडेशनच्या वतीने शिवगौरव सोहळा उत्साहात


जामखेड  येथे ल. ना. होशिंग विद्यालयात शिवगौरव सोहळा कार्यक्रमाचे आयोजन जिव्हाळा फाउंडेशन आणि विश्‍वदीप फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले होते. सालाबादप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव आदर्श पद्धतीने व्हावा.त्यामुळे शिवाजी द मनेजमेंट गुरु नामदेव जाधव यांचे व्याखानाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन नामदेव जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच दि पीपल्स एज्यूकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अरुण चिंतामणी व राजेश मोरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलित करण्यात आले. यावेळी जिव्हाळा फौंडेशनचे अध्यक्ष मधुकर आबा राळेभात, न्यायाधीश मुजावर, न्यायाधीश सपकाळ, भानुदास बोराटे, मौलाना खालील, सिद्धार्थ घायतडक, गुलाबराव जांभळे, नामदेव राळेभात, सुर्यकांत मोरे, विकास राळेभात, पवन राळेभात, मनोज कुलकर्णी, दिगंबर चव्हाण, संजय वराट, मंगेश आजबे, दादा सरनोबत, शरद कार्ले, फिरोज कुरेशी व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

जिव्हाळा फौंडेशन आणि विश्‍वदीप फौंडेशनच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक व समाजामध्ये नवीन आदर्श देणार्‍या सर्वधर्मीय व्यक्तींचा समाजहितासाठी काम करणार्‍या संपत काळे, श्रीराम मुरुमकर, डॉ. पांडुरंग सानप, सागर शिंदे, प्रदीप कुडके, अशोक बांगर, सुहास सूर्यवंशी, अझहर काझी, शेरखान पठाण, आबेद पठाण, व जामखेड तालुक्यामध्ये वेगळ्या पद्धतीने शिवजयंती साजरी करणार्‍या गावांना व व्यक्तींना शिवगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी महापुरुषांची बदनामी करण्याचे धाडस कोणी करू नये म्हणून अहमदनगर येथील छींदम प्रकरणातील अशोक बिडवे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.


व्याख्याते राजमाता जिजाऊ मॉसाहेब यांचे वंशज नामदेव जाधव म्हनाले की, तरुणांनी शिवाजी महाराजांकडे एक उद्योजक शिवाजी महाराज या नजरेने पाहिले पाहिजे. त्यांचे नियोजन कौशल्य जाणून घेतले पाहिजे. मराठी तरुणांनी उद्योग धंद्याकडे वळावे. ती आजच्या काळाची गरज आहे. तसेच कमी भांडवलात सुद्धा उद्योग सुरु करता येतो. त्याचे रुपांतर मोठ्या उद्योगात होते. शून्यातून सुद्धा विश्‍व निर्माण होते. हे शिवाजी महाराजांनी दाखवून दिले आहे. तेव्हा जास्त नोकर्‍यांच्या मागे न पळता उद्योग उभारा व उद्याचा उद्योजक बना असे मोलाचे मार्गदर्शन करून तरुणांना एक नवी संजीवनी दिली.

हा कार्यक्रमासाठी जिव्हाळा फौंडेशनचे सदस्य रामराव निकम, अवदूत पवार, विश्‍व दीप फौंडेशनचे अध्यक्ष प्रदीप टापरे, रामराव मेहत्रे, पत्रकार नासीर पठाण, अजय अवसरे, प्रशांत नेटके, विक्रांत पोटरे, गणेश थोरात, अशोक वीर, सुरज काळे, धनंजय भोसले यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मधुकर राळेभात यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी, तर आभार पत्रकार किरण रेडे यांनी मानले