जिल्ह्यातील विरशैव कक्कय्या (ढोर) समाज बांधवांची जनगणना करणार -त्रिमुखे
विरशैव कक्कय्या (ढोर) समाज विकास मंडळ संघटनेच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यातील समाज बांधवांची जनगणना करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष रमेश त्रिमुखे यांनी कर्जत येथील मेळाव्यात बोलताना सांगितले. त्रिमुखे म्हणाले की, सर्व समाज बांधवांनी एक विचाराने व एक संघ करण्यासाठी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, तसेच वैद्यकीय लाभ मिळवून देण्यासाठीच 7 जुलै 2017 रोजी विरशैव कक्कय्या समाज विकास मंडळ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे या संस्थेच्या माध्यमातून जिल्हयातील समाजाची जनगणना करून समाजातील प्रत्येक शेवटच्या घटकांना आर्थिक शैक्षणिक वैद्यकीय लाभासाठी प्रयत्न करून संपर्क पुस्तिका तयार करण्यात येणार आहे. समाजातील होतकरू विद्यार्थ्यांना शासकीय शैक्षणिक योजना, शिष्यवृत्ती, वसतीगृहात प्रवेश यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आरोग्य विषयक समाजातील सभासद डॉक्टरांकडून तपासणी व उपचार मार्गदर्शन करणार असून शासकीय वैद्यकीय लाभ मिळवून देणार आहोत. सामाजिक कार्यात स्नेहसंमेलन आयोजित करून समाजातील होतकरू विद्यार्थी व सेवानिवृत्त कर्मचारी यांचा सत्कार करणे व सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच नगर येथे भव्य दिव्य कक्कय्या भवण उभारण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष रमेश त्रिमुखे यांनी दिली. या कार्यक्रमास बाबासाहेब त्रिंबके, सुरेंद्र बोराडे, किशोर भाळशंकर, गणेश नारायणाने, प्रशांत डहाके, अनिल त्रिमुखे, संजय कवडे, संजय खरटमल, सतीश केळगंद्रे, लक्ष्मण शिंदे, गणेश शिंदे, संतोष शिंदे, अमोल शिंदे, अनिल शिंदे, आकाश कटके, अतुल शिंदे, रवी शिंदे, संजय शिंदे, नाना त्रिंबके, ओंकार शिंदे, अविनाश शिंदे, सोमनाथ शिंदे, मंगेश शिंदे, अशोक कटके, आदी उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक विरशैव कक्कय्या मंडळाचे सदस्य गणेश शिंदे यांनी, तर आभार अविनाश शिंदे यांनी मानले.