पदवीदान समारंभाने पालक झाले आनंदीत!
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व शिर्डी लोकसभा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास स्कुलच्या संचालिका व रणरागिणी महीला मंडळाच्या अध्यक्षा धनश्री विखे पाटील उपस्थित होत्या.
स्कुलच्या विद्यार्थ्यांचा अगदी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांप्रमाणे पदवीदान समारंभ आयोजीत करण्यात आला होता. यावेळी विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन करताना विखे म्हणाल्या की, छोट्या विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ हा खुप आगळा वेगळा आहे. मुलांना खेळण्याच्या वयात हसत खेळत शिक्षण मिळाले पाहीजे. त्यांनी शैक्षणिक वर्षभरात केलेल्या अभ्यासाची पावती आज आपण त्यांना देत आहोत. येवढ्या लहान वयात दिलेली पदवी पाहुन त्यांना मोठेपणी नक्की अभिमान वाटेल.
याप्रसंगी चेअरमन डॉ. सुजय विखे, धनश्री विखे यांच्यासह पालकांनी मनोगत व्यक्त केले. हा पदवीदान समारंभ यशस्वी करण्यासाठी प्राचार्य किरण चेचरे, प्रा. अनिता निमसे, सुनिल दरेकर, पठाण, जेजूरकर, कविता तोडमल, संगिता बोरकर, थोरात, वर्पे, कुटे, बेबी दहीवाळ, सुनिता भट्टेवाढ, गुंजाळ, अनिता भंडागे आदींनी विशेष परिश्रम घेतले.