युवानचा विद्यार्थी सद्दामची जिद्दीने पोलीस दलात निवड अनाथश्रम ते पोलीस व्हाया 'युवानचा' प्रेरणादायी प्रवास
त्याचवेळी त्याला एका मित्राने 'युवानबद्दल' माहिती दिली. हा त्याच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरला. बेकरीतील पूर्ण वेळ काम सुटल्याने आणि युवान स्पर्धा परिक्षा ग्रंथालय व अभ्यासिकेतील वातावरणामूळे त्यास पुन्हा अभ्यासिकेची गोडी लागली. कॉलेज सोबत मागील ३ वर्षापासून तो 'युवान'मधील इतर विद्यार्थ्यांसोबत स्पर्धा परिक्षांचा मेहनतीने अभ्यास करु लागला. सकाळी व्यायाम युवान किचन मध्ये स्वतः स्वयंपाक बनाविणे दुपारी अभ्यास संध्याकाळी सर्व धर्म प्रार्थना रात्री उशीरापर्यंत पुन्हा अभ्यास असे त्याचे वेळापत्रक होते.
मागील वर्षी झालेल्या पोलीस भरतीत केवळ ४ मार्कांनी त्याचे मेरिट कमी पड़ले. त्यास युवानचे प्रेरणास्रोत पोलीस महानिरिक्षक कृष्णप्रकाश यांचे मार्गदर्शन मिळाले. 'युवानमधील' प्रोत्साहनामूळे व कठोर मेहनतीने यावर्षी भरती व्हायचचं, या जिद्दीने तो भरती प्रक्रियेत उतरला होता. त्यामूळेच त्याची यावेळी निवड झाली. यावर समाधान न मानता पोलीस अधिकारी होण्याचे सद्दामचे स्वप्न आहे. त्याच्या यशाबद्दल त्याचे सी.ए. अशोक पितळे, उदयोजक नरेंद्र फिरोदिया, प्रतिभाजी धूत आदिंनी अभिनंदन केले.