मटका चालविणारा इसम जेरबंद
राहुरी : देवळाली प्रवरा येथील समर्थ बाबुराव पाटील महाराज यांच्या मंदिरासमोर मटका चालविणारया लोकांकडून पैसे घेऊन मटका जुगार घेणारा गंगाधर भाऊसाहेब गायकवाड या इसमाला श्रीरामपूर विभागाचे पोलिस उपधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकातील रविंद्र मोढे या पोलिस कर्मचारयाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात मुंबई जुगार अॅक्ट कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, ही कारवाई श्रीरामपूरच्या पोलिस पथकाने केल्याने देवळाली स्थानिक पोलिस संशयाच्या भोवरयात सापडले आहेत. राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा परिसरात अवैध मटका जुगारयांचा उपद्रव वाढला आहे. देवळाली गावाचे ग्रामदैवत समर्थ बाबुराव पाटील महाराज यांच्या मंदिरासमोर स्थानिक पोलिस प्रशासनाच्या छुप्या आशिर्वादाने मटका जुगार सर्रास सुरु आहे.