रस्ता लुटीतील आरोपी गजाआड
राहुरी : ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरसाठी इंधन घेऊन जाणार्या वाहन चालकास लुटणारया तिघांचा राहुरी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. प्रतिक अर्जुन लटके, आकाश बाळासाहेब बर्डे अशी यातील आरोपींची नावे असून एका अल्पवयीन आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.
डॉ. आंबेडकर जयंतीच्या {दि. १४ } रात्री अडीचच्या दरम्यान ही लुटीची घटना घडली होती. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे या पाथर्डी दौरा करणार असल्याने हेलिकॉप्टरसाठी इंधन घेऊन वाहन चालक रोहित चंद्रकांत खोडके {रा. नाशिक } हे जात होते. राहुरीतून इंधन घेत पाथर्डीकडे जात असताना खोडके यांना वांबोरी येथील रेल्वे चौकीसमोरील बंद गेटजवळ या आरोपींनी लुटले होते. या आरोपींनी खोडके यांच्याकडील रोख रक्कम ३ हजार ५०० आणि २ ग्रॅम सोन्याचा ओम असा ऐवज चोरला होता.