नाशिकचा फरार संशयित दरोडेखोर जेरबंद
।संगमनेर/प्रतिनिधी।तालुक्यातील डोळसणे शिवारात नाशिक पुणे महामार्गावर आज {दि. १७} पहाटे तीनच्या सुमारास चार दुचाकीस्वार चोरटे दरोड्याच्या उद्देशाने संशयितरित्या फिरत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी दुचाकीस्वारांचा पाठलाग केला असता त्यातील एक संशयित आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडला.
खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार रात्रीची गस्त घालणाऱ्या पोलिसांनी संशयित संदीप खंडू पवार { रा. नांदगाव, नाशिक} याला दुचाकी वाहनासह ताब्यात घेतले. पोलिस उपनिरीक्षक अन्सार इनामदार, उपनिरीक्षक मंगलसिंग परदेशी, पो. कॉ, नामदेव बिरे, राजू वायकर आदींनी ही कारवाई केली. डोळासणे गावातून दोन मोटारसायकल भरधाव वेगाने नाशिक पुणे महामार्गाच्या दोन बाजूला गेल्या. त्यातील एक सतीची वाडी या दिशेने गेली, तर दुसरी मॉन्टे कार्लोच्या ऑफीसच्या दिशेने गेली. मात्र पुढे रस्ताच नसल्याने मोटारसायकल तिथेच सोडून आरोपींनी पळ काढला. पाठलागावर असलेल्या पोलिसांनी त्यातील एकाला दरोड्याची हत्यारे व बजाज पल्सर या दुचाकीसह शिताफीने ताब्यात घेतले. यावेळी दुसऱा संशयित मात्र फरार झाला. या धावपळीत एक पोलिस कर्मचारी जखमी झाला.
दरम्यान, पोलिसांनी पकडलेला आरोपी दोनच महिन्यांपूर्वी मोक्कातून सुटला होता. त्याचे फरार झालेले साथीदार मध्यप्रदेशातील सराईत गुंड आहेत. त्याने उद्या {दि. १८ } नगर येथे नागमण्याचा सौदा सुमारे ४० लाख रुपयात होणार असल्याची माहिती दिली आहे.