Breaking News

कठुआ प्रकरण : विद्यार्थी आणि सुरक्षा दलांमध्ये संघर्ष

श्रीनगर : उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला आणि दक्षिण काश्मीरमधील शोपीयान येथे कठुआतील 8 वर्षाच्या मुलीवर झालेल्या बलात्कार व हत्येचा निषध करणारे विद्यार्थी आणि सुरक्षा दलांमध्ये आज संघर्ष पाहायला मिळाला.आंदोलक विद्यार्थ्यांनी शोपीयान आणि बारामुल्लामधील देलिना भागातील रस्ता आडवत सुरक्षा दलाच्या दिशेने दगडफेक केली. त्यानंतर सुरक्षा दलांनी देखील आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर केला. शैक्षणिक संस्थांमधील काम बंद असताना देखील अनेक विद्यार्थी आंदोलनासाठी जमा झाले होते. श्रीनगर, गंडेरबाल, पुलवामा, कुलगाम, शोपीयान आणि अनंतनाग या जिल्ह्यांमध्ये या घटना घडल्या. बुधवारी अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्यानंतर सुरक्षा दलांनी पुन्हा संघर्ष होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय योजना केल्या आहेत.