Breaking News

न्यायमूर्ती लोया यांचा मृत्यू नैसर्गिकच सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली


नवी दिल्ली : न्यायमूर्ती लोया मृत्यू प्रकरणाची विशेष तपास पथकाकडून चौकशी करण्याच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. मागील महिन्यात या प्रकरणी दाखल झालेल्या याचिकांवर सुनावणी झाली होती. मात्र, न्यायालयाने निकाल राखीव ठेवला होता. या अगोदर न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला सीबीआयचे न्यायाधीश लोया यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल सादर करण्यास सांगितला होता. 2014 मध्ये लोया यांचा एका गंभीर विषयावर सुनावणी करत असतानाच संशयस्पद मृत्यू झाल्याचा आरोप आहे. न्यायमूर्ती लोया सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणाची सुनावणी करत होते. यात अनेक पोलीस अधिकारी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह हे देखील आरोपी होते. या प्रकरणी महाराष्ट्रातील पत्रकार बी. एस. लोने आणि तेहसीन पुनावाला यांनी स्वंतंत्रपणे याचिका दाखल करून चौकशीची मागणी केली होती. विरोधी पक्षाने देखील या प्रकरणाची विशेष तपास पथकाकडून चौकशीची मागणी करताना 114 खासदारांच्या सहीचे निवेदन राष्ट्रपती कोविंद यांना देखील दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 4 ज्येष्ठ न्यायाधिशांनी देखील मध्यंतरी पत्रकार परिषदेत लोया यांच्या मृत्यूप्रकरणी उपस्थित करण्यात येत असलेल्या संशयांना गंभीर म्हणत चौकशीला पाठिंबा दर्शवला होता.