Breaking News

‘भागचंद ठोळे इंग्लिश मिडीयम’चे काम सुरू


कोपरगांव, आज प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा निर्माण होत आहे. शिक्षणक्षेत्रही त्याला अपवाद राहिलेले नाही. कोपरगांव शहर व तालुक्यातील विद्यार्थ्यांना सुरूवातीच्या काळी अद्यावत शिक्षण देण्यात गोकुळचंद विद्यालयाने मोठा पाया घातला आहे. मराठीबरेाबरच इंग्रजी माध्यमातही विद्यार्थी मागे राहु नये, यासाठी कोपरगांव एज्युकेशन सोसायटी संचलित गोकुळचंद विद्यालयाशी संलग्न असलेल्या भागचंद माणिकचंद ठोळे इंग्लिश मिडीयम स्कुलच्या विस्तारीत इमारतीचे काम सुरू केले आहे, अशी माहिती उद्योजक आणि विश्वस्त कैलास ठोळे यांनी दिली.

शहरातील भागचंद माणिकचंद ठोळे इंग्लिश मिडीयम स्कुलच्या विस्तारि इमारतीचे भुमिपूजन स्कुल कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत अजमेरे यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सचिव दिलीप अजमेरे, सुधा ठोळे, शोभा ठोळे, प्रकाश ठोळे, सचिन अजमेरे, डाॅ. अमोल अजमेरे, मुख्याध्यापक शिक्षक पालक आदी उपस्थित होते.