Breaking News

एक्सप्रेस फिडर शेतक-यांसाठी महत्वाची बाब : पाचोरे


पाझर तलाव गोदावरी उजव्या कालव्याच्या ओव्हरफलोच्या पाण्यातून भरण्यासाठी एक्सप्रेस फिडर अत्यंत महत्वाचे होते. त्यासाठी आ. स्नेहलता कोल्हे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानेच १ कोटी १९ लाख रूपये त्यासाठी मिळाले. त्यापैकी ५२ लाख रूपयांचा निधीही वर्ग झाला आहे. या भागातील शेतक-यांसाठी ही बाब अत्यंत महत्वाची आहे, असे प्रतिपादन विक्रम पाचोरे यांनी केले. 
तालुक्याच्या पश्चिम भागातील महत्वाच्या उजनी उपसा सिंचन योजना टप्पा एक व दोन रांजणगांव देशमुखसाठी १ कोटी १९ लाख रुपयांच्या एक्सप्रेस फिडर कामांस मंजुरी मिळविल्याबददल या परिसरातील अकरा गांवच्या ग्रामस्थांच्यातीने आ. स्नेहलता कोल्हे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. 

ते म्हणाले, रांजणगांव देशमुख, धोंडेवाडी, मनेगांव वेस, सोयेगांव, अंजनापूर, जवळके, बहादरपूर आदी अकरा माजीमंत्री शंकरराव कोल्हे व संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी या योजनेच्या कामासाठी तत्कालीन शासनांकडेही पाठपुरावा केला. त्यामुळेच त्याचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. 

याप्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष शरद थोरात, संचालक संजय होन, भास्करराव भिंगारे, अशोक रोहमारे, कोपरगांव बाजार समितीचे उपसभापती नानासाहेब गव्हाणे, कोपरगांव तालुका देखरेख संघाचे रामदास रहाणे, माजी सरपंच कैलास रावण रहाणे, रांजणगांव देशमुखचे सरपंच संदीप रणधीर आदींसह मल्हारवाडी, काकडी परिसरातील असंख्य शेतकरी उपस्थित होते.