Breaking News

अॅग्रो इनपुट डिलर्सचे आज राष्ट्रीय महाअधिवेशन


कृषिराष्ट्र मंगलम अंतर्गत नवीदिल्ली येथील अॅग्रो इनपुट डिलर्स असोसिएशच्यावतीने कोपरगांवजवळील साईसृष्टी निसर्ग लाॅन्स येथे दोन दिवशीय राष्ट्रीय महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. या अधिवेशनाचा समारोप ८ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती अॅग्रोइनपुट डिलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष मनमोहन कलंत्री, खजिनदार आबासाहेब भोकरे व महाराष्ट्र राज्य फर्टिलायझर पेस्टीसाईडस सीडस डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश कवडे यांनी दिली. राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हेदेखील या महाअधिवेशनास उपस्थित राहणार आहेत.
दि. ७ एप्रिल रोजी सकाळी साडेदहा वाजता या महाअधिवेशनाचे उदघाटन होणार आहे. याप्रसंगी केंद्रीय रसायन व खत मंत्री अनंत कुमार, राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला, केंद्रीय कृषीराज्यमंत्री गजेंद्रसिंग शेखावत, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, केंद्रीय जल राज्यमंत्री अर्जुन राम मेघावत, रासी सीडसचे अध्यक्ष एम रामास्वामी, एनएसएल ग्रुपचे अध्यक्ष एम प्रभाकर राव, साउथ अशिया एफएमसीचे व्यवसाय संचालक एस. एन. श्रीनिवास, कृषिमंत्री पांडूरंग फुंडकर, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, खा. रामचरण बोहरा, खा. चंद्रकांत खैरे, खा. संजय पाटील, खा. सदाशिव लोखंडे, खा. दिलीप गांधी, खा. राजीव सातव, आ. मोहनलाल गुप्ता (जयपूर), आ. स्नेहलता कोल्हे, शिर्डी नगरपंचायतीच्या अध्यक्षा योगिता अभय शेळके आदी उपस्थित राहणार आहेत.

या महाअधिवेशनाचा समारेाप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दि. ८ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता होणार आहे. जास्तीत जास्त शेतक-यांनी व कृषी व्यावसायिकांनी या महाअधिवेशनास उपस्थित रहावे, असे आवाहन अॅग्रो इनपुट डिलर्स असोसिएशन नवीदिल्लीचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम खंडेलवाल, हरमेशसिंग सिरसा, मनसिंग राजपुत, मनिंदर गौरीशेटटी, द्वारिका गुप्ता, ब्रिजेंद्रसिंग, विश्वस्त सत्यनारायण कासट, व्यवस्थापकीय सचिव प्रविण पटेल, सचिव अरविंद पटेल, सुरेंद्रसिंग बरिवाल, एम. सत्य. मूर्ती, व्ही. व्ही. नागीरेडडी, संजयकुमार रघुवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी आदी पदाधिका-यांनी केले आहे.