Breaking News

जामखेड शहरातील विविध ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन


जामखेड शहर प्रतिनिधी - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १६७ व्या जयंतीवर्षानिमित्त शहरातील विविध ठिकाणी अभिवादन करण्यात आले. बाजारतळावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजमंदिर, महात्मा फुले नगर, मिलिंदनगर, सिध्दार्थ नगर, सदाफुलेवस्ती, आरोळेवस्ती, जामखेड आगार, बाजार समिती, राष्ट्रवादीच्या व भाजपाच्या वतीनेही जयंती साजरी करण्यात आली . समस्त आंबेडकरी अनुयायांच्या वतीने सकाळी ११ वाजेच्या दरम्यान डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. या वेळी झालेल्या विविध कार्यक्रमांच्या वेळी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष नगरसेवक निखिल घायतडक, भाजपा शहराध्यक्ष सोमनाथ राळेभात, बाजार समिती संचालक सागर सदाफुले, जेष्ट नेते सिध्दार्थ घायतडक, सामाजिक कार्यकर्ते विकी भाऊ सदाफुले, प्रा. विकी घायतडक, नगरसेवक गुलशन आंधारे, अमित चिंतामणी, मोहन पवार, विद्या राजेश वाव्हळ, निळकंठ घायतडक, नगरसेवक अमित जाधव, ऋषीकेश बांबरसे, बौद्धाचार्य आशोक आव्हाड, संजय वारभोग, गोकुळ गायकवाड, महेंद्र घायतडक, राहुल अहिरे, भारिपचे तालुका अध्यक्ष बापूसाहेब गायकवाड, बौद्ध महासभेचे अध्यक्ष रमेश सदाफुले, विनोद सोनवणे, रवि सोनवणे, अतिष पारवे आदिंसह विविध क्षेत्रातील मान्यवर व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. जामखेड तालुका 'राष्ट्रवादी' चे वतीनेही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. या निमित्त *जामखेड तालुका राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी च्या वतीने प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी राष्ट्रवादी चे प्रदेश संघटक राजेंद्र कोठारी,जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय वारे, नेते शहाजी राळेभात,शहराध्यक्ष राजेंद्र गोरे, उमर कुरेशी,प्रकाश काळे,संभाजी राळेभात,हरिभाऊ आजबे,भारत चव्हाण,सुहास आव्हाड, सुनील सदाफुले,उपप्राचार्य गायकवाड सर,प्रा.पंडित सर,प्रा.आव्हाड सर,संतोष राऊत सर,धनराज पवार,आहिरे सर आदी उपस्थित होते. धार्मिक विधी बौद्धाचार्य अशोक आव्हाड आणि पत्रकार संजय वारभोग यांनी पार पाडले. छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड जामखेड याठिकाणी सभापती मा गौतम आण्णा उतेकर, संचालक काकासाहेब गर्जे, त्रिंबक कुमटकर, सोमनाथ सातव, नवले पाटिल, सुभाष आप्पा जायभाय, महादेव डुचे , आरुण महारनवर, संजय वराट, मकरंद काशिद, सचिव वाहेद भाई सय्यद व कर्मचारी यांच्या उपस्थितीत अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यानंतर संध्याकाळी ४ वाजेदरम्यान भव्य मिरवणूक काढण्यात आली.