पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंब सहाय्य योजनेतून भोरे कुटूंबातील विवाह सोहळ्यास मदतीचा हात
जनसेवा फौंडेशनच्या डॉ.बाळासाहेब विखे पाटील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंब सहाय्य योजने अंतर्गत जामखेड तालुक्यातील देवदैठन येथील भोरे या कुटुंबातील मुलीला लग्नासाठी अर्थिक मदतीचा धनादेश पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुजय विखे पाटील यांच्या हस्ते देण्यात आला.
अहमदनगर जिल्ह्यातील २०८ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाना विखे पाटील परिवाराने जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून दत्तक घेऊन या कुटुंबातील व्यक्तींना शैक्षणिक, आरोग्य, रोजगार आणि नोकरीबाबतच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता .लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या योजनेची सुरूवात करण्यात आली होती. विधानसभेतील विरोधी पक्षनेते ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून १५ जून २०१७ पासून या योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या मदतीसाठी अशा प्रकारची योजना सुरूवात करणारे विखे पाटील कुटुंब देशात एकमेव आहे.
जामखेड तालुक्यातील शेतकरी कै.सुर्यकांत परमेश्वर भोरे यांनी नापीकी व कर्जबाजारी झाल्याच्या कारणाने ७ जुन २०१६ रोजी आपले आयुष्य संपविले होते. कु.प्रीयांका सुर्यकांत भोरे या कुटुंबातील मुलीने आलेल्या परिस्थितीवर मात करून आपले शिक्षण पूर्ण केले. कु.प्रीयांका सुर्यकांत भोरे ही कन्या येत्या १९ एप्रिल २०१८ रोजी विवाहबद्ध होत असून, जनसेवा फौंडेशनच्या माध्यमातून तिच्या विवाहाकरिता युवानेते डॉ.सुजय विखे पाटील यांच्या हस्ते. ५० हजार रुपये रक्कमेचा धनादेश नातेवाईकांच्या उपस्थितीत देण्यात आला.
पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुजय विखे पाटील यांच्या पुढाकाराने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या मदतीसाठी ही दत्तक योजना सुरू करण्यात आली. या योजनेत कुटुंबाला विशेष ओळखपत्र देण्यात आले. वैद्यकीय सुविधांसाठी विळद घाटातील डॉ.विठ्ठलराव विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार, शिक्षणासाठी मदत, नोकरीसाठी सहकार्य करतानाच ,उदरनिर्वाहासाठी शिलई मशीन व पिठाची गिरणी उपलब्ध करून देण्यात आली होते. याशिवाय कुटुंबातील मुलीच्या लग्नासाठी अर्थिक सहकार्य करण्याची तरतूद देखील योजनेत करण्यात आली होती.
नगर जिल्ह्यात मागील काही वर्षांत झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या या मनाला वेदनादायी होत्या. या शेतक-यांच्या मदतीसाठी शासनस्तरावर केवळ घोषणा होतात, प्रत्यक्षात जिथे शासनाची यंत्रणा पोहचलीच नाही आशा कुटुंबापर्यंत जनसेवा फौंडेशन पोहचले. सामाजिक दायित्व म्हणून या कुटुंबातील व्यक्तींसाठी काही करता येत असल्याचे समाधान मोठे आहे असे डॉ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले.
लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या या योजनेची अंमलबजावणी जनसेवा फौंडेशनच्या माध्यमातून प्रभावीपणे होत असून, दत्तक घेतलेली २०८ कुटुंब ही आमच्या परिवारातील आहेत असे मानून या कुटुंबाना कोणत्याही मदतीसाठी आम्ही तत्पर असल्याचे डॉ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले.