राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉ. आंबेडकरांना अभिवादन
जामखेडमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्यावतीने महामानव तथा भारतीय राज्य घटनेचे भाग्य विधाते पूजनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. शहरातील शनिमंदिर चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक तालूका कार्यवाह विनोद उगले, जिल्हा धर्माचार्य सूरेश कूलथे तालूका, समरसता प्रमुख भाऊसाहेब उन्हाळे, मनिष मासाळ, ऋषिकेश मिरासी, विश्व हिंदू परिषदेचे तालूकाध्यक्ष दिगांबर राळेभात, नगरसेवक तथा उत्सव समितीचे अध्यक्ष निखिल घायतडक, उपनगराध्यक्ष महेश निमोणकर, भाजपाचे शहराध्यक्ष सोमनाथ राळेभात, नगरसेवक अमित, चिंतामणी, गूलशन अंधारे, ऋषिकेश बांबरसे, मोहन पवार, राजेश वाव्हळ, बापू गायकवाड, ना राम शिंदे यांचे स्वियसहाय्यक गोरख घनवट, बौध्दचार्य गोकुळ गायकवाड, मनोज घोडेस्वार यांच्यासह संघाचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
