दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब आढळले.
हंसखली : पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातएका तलावाचे खोदकाम सुरू असताना दुसऱ्या महायुद्धातील दोन बॉम्ब आढळल्याने खळबळ उडाली. शनिवारी हसंखली पोलीस ठाणे हद्दीतील छोटा चोपरी गावात एका तलावाचे खोदकाम सुरू असताना गॅस सिलिंडर आकाराच्या दोन वस्तू आढळून आल्या. यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी ५० व ३८ इंच लांबीच्या या वस्तूंची पाहणी केल्यानंतर हे दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब असल्याचे निदर्शनास आले. लष्करी विभागाच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात माहिती दिली असून १९४० दरम्यान दुसऱ्या महायुद्धातील हे दोन्ही बॉम्ब ताब्यात घेतल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्याने दिली.