प्रवीण तोगडिया यांचे आमरण उपोषण सुरू
विश्व हिंदू परिषदेचे माजी कार्यकारी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी मंगळवारपासून आमरण उपोषणास सुरुवात केली. या वेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार हल्ला चढवला.
तोगडिया यांनी मोदींवर कोट्यवधी हिंदूंचा भ्रमनिरास केला तसेच आधीच्या सरकारला विरोध करणाऱ्या सर्व मुद्द्यांवर यू-टर्न घेतल्याचा आरोप केला. आपल्या आवेशपूर्ण भाषणात त्यांनी मोदी सरकार हिंदूंच्या मृतदेहांवर सत्तेवर आल्याचे सांगितले. तोगडिया यांनी येथे पालडी येथील डाॅ. वणिकर भवनमध्ये राम मंदिर कायदा, गोरक्षा कायद्यासह अन्य मुद्द्यांबाबत साधू-संतांसोबत उपोषणास सुरुवात केल्यानंतर सांगितले की, जी आश्वासने देऊन भाजप सत्तेपर्यंत पोहोचली त्या मागणीवर आपण ठाम आहोत. त्यांना राम मंदिराची मागणी अथवा विहिंप सोडण्यास सांगितले होते, आपण शीर कापू शकतो; परंतु हिंदूंशी गद्दारी करू शकत नाहीत.