युवतींनी पालकांशी मित्र समजून संवाद साधावा श्रीमती आशाताई फिरोदिया
भारतीय जैन संघटनेतर्फे जैन मुलींसाठी आयोजित ‘स्मार्ट गर्ल्स’ कार्यशाळेचे उद्घाटन श्रीमती आशाताई फिरोदिया यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी त्या बोलत होत्या.या प्रसंगी उद्योजिका मधुबाला चोरडिया,बीजेएसचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पारख, बिजेएस पुना सीईओ नरोत्तम रेड्डी, माजी सीईओ मंजिरीजी, ज्येष्ठ पदाधिकारी अरूण दुग्गड,शशिकांत मुनोत,संजय गुगळे,बिजेएस नगर जिल्हाध्यक्ष आदेश चंगेडीया,महिला अध्यक्ष प्रीतम राका,सदस्य सुवर्णा डागा,प्रियंका चंगेडीया,शर्मिला गुगळे,पायल चंगेडीया , अल्पना कासवा, दीपा भळगट,सीमा मुनोत,उज्वला बाफना,ज्योती बोथरा,कविता मुनोत,रुही भन्साळी,नूतन फिरोदिया,केतन बलदोटा, योगेश चंगेडीया, संतोष कासवा,गिरीष अग्रवाल उपस्थित होते.
यावेळी प्रफुल्ल पारेख म्हणाले कि,आजची तरुणपिढी हि अत्यंत हुशार असून युवती या अधिकच स्मार्ट आहेत.त्यांना योग्य दिशा व संधी देऊन ,समाज व पालकांशी वेगळे नाते निर्माण करण्यासाठी ‘स्मार्ट गर्ल्स’ टू बी हेपी,टू बी स्ट्रोंग हि कार्यशाळा निश्चितच उपयुक्त ठरेल.
ठराविक वयानंतर मुलीना परिपूर्ण स्वातंत्र्य मिळते का?त्यांच्या कल्पनांना विचारांना वाव मिळतो का?पालकांचे सहकार्य मिळते का? हे सारे प्रश्न या माध्यमातून सोडवून या कार्यशाळेतून त्या नवीन विचार संस्कार घेऊन जातील.
जग बदलत असताना पालक व युवकातील कमी होणारा संवाद, काय चुकीचे काय बरोबर यावर त्यांच्यात असलेला दुरावा दूर करून असाध्य गोष्टी त्या करू शकतात हि भावना त्यांच्यात योग्य वयात राबविली पाहिजे या हेतूने सातवी ते दहावीतील मुलींसाठी हि कार्यशाळा आहे. यामुळे पालकांचा आपल्या मुलींवरचा विश्वास तर वाढेल पण त्यांना योग्य वेळी स्वातंत्र्य हि दिले जाईल असे मतही पारख यांनी मांडले .दोन दिवसात स्वजागृकता,संवाद व नातेसंबंध,मासिकधर्म स्वच्छता,आत्मसन्मान व स्वरक्षण,निर्णय व निवड क्षमता यावर प्रफुल्ल पारख मार्गदर्शन करणार आहेत.