Breaking News

आंबेडकर जयंती निमित्त निलक्रांती चौकात आयोजित शरीर सौष्ठव स्पर्धेला युवकांचा उत्सफुर्त प्रतिसाद

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त निलक्रांती चौकात आयोजित करण्यात आलेल्या आंबेडकर श्री शरीर सौष्ठव स्पर्धेला युवकांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत आंबेडकर श्री 2018 चा टायटल भारत पवार याने पटकाविला. तर बेस्ट इम्प्रुमेंट तुषार पारधे, बेस्ट मस्न्युलर रविंद्र सूर्यवंशी व बेस्ट पोझरचा मानकरी आदम बागवान ठरला.

या शरीर सौष्ठव स्पर्धेचे उद्घाटन रिपाईचे राज्य सचिव अशोक गायकवाड, प्रा.जयंत गायकवाड व भिम महोत्सव समितीचे संयोजक अजय साळवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महेश भोसले, गणेश पाखरे, भीमराव पगारे, विलास साठे, निलक्रांती मित्र मंडळाचे भाऊ साळवे, गिरीश जाधव, सलिम शेख, विनोद भिंगारदिवे, सुमेध गायकवाड, अशोक भिंगारे, दिलीप ठोकळ, विनोद भिंगारदिवे आदींसह निलक्रांती चौक मित्र मंडळ, फुले, शाहू आंबेडकर जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अशोक गायकवाड म्हणाले की, निरोगी शरीराने जीवन आनंदी बनते. यासाठी व्यायामाची गरज आहे. स्पर्धेच्या युगात निराशा आल्याने युवक व्यसनाकडे वळत असून, युवा वर्ग व्यायामाकडे वळाल्यास निरोगी जीवन व्यतीत करता येणार आहे. यासाठी युवकांना व्यायाम करण्याचे आवाहन करुन, अशा स्पर्धांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
अहमदनगर डिस्ट्रीक्ट बॉडी बिल्डर्स अ‍ॅण्ड फिटनेस असो. च्या मान्यतेने झालेल्या या शरीर सौष्ठव स्पर्धेत जिल्ह्यातील सत्तरपेक्षा जास्त युवा बॉडी बिल्डर्स सहभागी झाले होते. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक, सन्मानचिन्ह व रोख रक्कम बक्षिस स्वरुपात देण्यात आली. स्पर्धेचे पंच म्हणून राष्ट्रीय पंच जयंत गिते, सोहेल शेख, अंकित गिते, दत्ता रणसिंग, मिलिंद घोरपडे, संजय सुरवसे, अभय हलवाई, सद्दाम सय्यद, सागर येवले, डॉ.विश्रांती आढाव, समीर पवार आदिंनी काम पाहिले.