Breaking News

जमिनीच्या वादातून महिलेसह मुलांना मारहाण


मुकुंदनगर येथे जमिनीच्या वादातून कुटुंबातीलच १० ते १५ जणांच्या जमावाने घरात घुसून महिला व तिच्या मुलांना मारहाण केल्याची घटना घडली असून याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात १० ते १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुकुंदनगर येथील मिलींद कॉलनीत राहणाऱ्या तरन्नूम सय्यद जावेद (वय ३५) या आपल्या दोन मुलांसह वास्तव्यास असून सोमवारी (दि. २३) रात्री १० च्या सुमारास त्यांच्या कुटुंबातील सर्फराज अब्दुलगणी सय्यद, सोहेल अब्दुलगणी सय्यद, महेरुन्नीसा सय्यद, शब्बु गफार (सर्व रा. मुकुंदनगर), शकीना सय्यद छोटू (रा. अंधेरी मुंबई) यांच्यासह १० ते १५ जणांनी घरात प्रवेश करत जमिनीच्या वादाच्या कारणावरुन तरुन्नम व त्यांच्या मुलांना शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच घरातील कपाट व इतर साहित्याचे नुकसान करुन गळ्यातील मंगळसुत्र बळजबरीने चोरुन नेले.