Breaking News

धारदार शस्राने जीवे मारण्याचा प्रयत्न

डाळिंबाच्या रोपाचे ५० हजार रुपये मागितल्याचा राग आल्याने कोल्हार येथे काठी, दांडके व धारदार शस्राने एकास बेदम मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. याबाबत कोल्हार येथील पाच जणांविरोधात लोणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना काल (दि. २४) रात्री साडेसहाच्या सुमारास बेलापूर- राजुरी रस्त्यालगत घडली.. याबाबत अमोल साहेबराव खर्डे (रा. कोल्हार) यांनी लोणी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून किरण शिवाजी राऊत, मिलिंद शिवाजी राऊत, संजय रामदास राऊत, सुप्रिया किरण राऊत व इतर अनोळखी तीन व्यक्ती (सर्व रा. कोल्हार) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार काल (दि. २४) रात्री साडेसहाच्या सुमारास कोल्हार- बेलापूर- राजुरी रस्त्यालगत छत्रपती चौकात डाळिंबाच्या रोपाचे ५० हजार रुपये मागितल्याचा राग आल्याने वरील पाच जणांनी अमोल साहेबराव खर्डे यास काठी, दांडके लाथा- बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच धारदार शस्राने डोक्यावर वार केले. घटनेनंतर अमोल खर्डे यास लोणी येथील प्रवरा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. . मारहाण केल्याप्रकरणी वरील पाच जणांविरोधात लोणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा र.नं ८३/१८ नुसार भा.दं.वि. कलम ३०७ अन्वये धारदार शस्राने जीवे मारण्याचा प्रयत्नाचा व ३२७, ३४१, १४३, १४७, १४९, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप कुणासही अटक करण्यात आली नाही. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे करीत आहेत.